Home /News /lifestyle /

मधुमेहासारख्या आजारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी सांगितलं सिक्रेट, वाचा सविस्तर

मधुमेहासारख्या आजारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी सांगितलं सिक्रेट, वाचा सविस्तर

तुम्ही वेळेवर, नियमित आणि तोही लवकर ब्रेकफास्ट करण्याची सवय लावलीत, तर त्यानं तब्येतीवर तर सकारात्मक परिणाम होईलच पण तुमचं आयुष्यही वाढेल.

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं (Healthy Life) राहावं, आपल्याला डायबेटीस, (Diabetes ) बीपी (BP) असे काही आजार होऊ नयेत अशीच प्रत्येकाची इच्छा असते; पण त्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. ज्यांना दीर्घायुष्य हवं आहे, त्यांच्यासाठी काही आरोग्यविषयक टिप्स (Healthy Tips) अनेकदा सांगितल्या जातात. ब्रेकफास्ट (Breakfast) आणि दीर्घायुष्य यांचं जवळचं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल डॉक्टर्सनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. दीर्घायुष्यासाठी सकाळचा नाश्ता वेळेवर (Breakfast on Time) करणं महत्त्वाचं आहे असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. न्यूयॉर्कमधल्या सिटी युनिव्हर्सिटीच्या (City University) संशोधकांनी सकाळचा नाश्ता आणि दीर्घायुष्य यांच्यातला संबंध काय आहे हे शोधण्यासाठी संशोधन केलं. या संशोधनात 40 वर्षांच्या 34 हजार अमेरिकन नागरिकांच्या खाण्यापिण्याचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी या व्यक्तींच्या खाण्यापिण्याची वेळ आणि मृत्युदर अशा दोन्हींच्या नोंदी केल्या. या संशोधनातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान ज्या व्यक्ती ब्रेकफास्ट करतात त्यांना हृदयाच्या (Heart disease) आजारांमुळे मृत्यूचा धोका सहा टक्के कमी होतो, असं जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका असं संशोधकांचं म्हणणं आहे. सकाळचा नाश्ता (Breakfast) तुमच्या शरीराची काम करण्याची क्षमता तर वाढवतोच; पण त्याचबरोबर इन्सुलिनसारख्या (Insulin) हॉर्मोन्सवरही नियंत्रण ठेवतो. हे ही वाचा-स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश सकाळी वेळेवर नाश्ता केल्यास ब्लड शुगर (Blood Sugar) वाढण्याचा धोकाही बऱ्यापैकी कमी होऊ शकतो, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. वेळेवर नाश्ता न करणं, नाश्त्याची वेळ चुकवणं असं करणाऱ्यांमध्ये ब्लड शुगर, लठ्ठपणा (Fatness) वाढणं अशा समस्याही आढळतात, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दीर्घायुष्यासाठी वेळेवर नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. सकाळी सात वाजण्याच्या आधी नाश्ता केला, तर त्याचा थेट परिणाम बॉडी क्लॉकवर पडतो. खाण्यासाठी जितका उशीर कराल तितका तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी तुमच्या आयुष्यावरही होतो, असं संशोधकांचं म्हणंणं आहे. रात्री उशिरा जेवल्यास हृदयरोग आणि डायबेटीसचा धोका वाढतो, असंही संशोधकांनी सांगितलं आहे. ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ब्रिटनमधल्या दर पाच व्यक्तींमागे एक व्यक्ती ब्रेकफास्ट करत नसल्याचं यातून समोर आलं होतं. तुम्ही वेळेवर, नियमित आणि तोही लवकर ब्रेकफास्ट करण्याची सवय लावलीत, तर त्यानं तब्येतीवर तर सकारात्मक परिणाम होईलच पण तुमचं आयुष्यही वाढेल.

    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या