Home /News /lifestyle /

आता कॅन्सरचा धोका टाळता येणार; शास्त्रज्ञांनी शोधून काढला उपाय

आता कॅन्सरचा धोका टाळता येणार; शास्त्रज्ञांनी शोधून काढला उपाय

कॅन्सरचा (cancer) धोका कमी कसा करता येईल, याबाबत शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर :  एखादा आजार होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाय करतो. आवश्यक ती काळजी घेऊन काही आजारांचा धोका टाळता येतो. मात्र कॅन्सरसारखा (cance) आजार कधी, कुणाला होईल सांगू शकत नाही. त्यामुळे विशिष्ट काळजी घेतली तर कॅन्सर होणार नाही असं सांगू शकत नाही. मात्र आता लवकरच कॅन्सरलाही प्रतिबंध करणं शक्य होणार आहे. शास्त्रज्ञांनी तसा मार्ग आता शोधून काढला आहे. नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील पेशींचं (cells) विभाजन होत असतं. मात्र विभाजन झालं नाही तर या पेशी मृत होतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. मात्र आता हा धोका कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला आहे. त्यांनी  पेशींच्या अनावश्यक वाढीला रोखणं हे महत्त्वाचे असतं पेशींच्या वाढीमुळे कर्करोगाचा धोका असतो वैज्ञानिकांनी तंत्रज्ञानाच्या सहा्याने हा धोका कमी केला आहे़. डीएनएचे (DNA) काही धागे असतात त्यांना टेलोमर्स (telomeres) म्हटलं जातं ते क्रोमोझोमच्या टोकाशी प्रोटेक्टिव्ह कॅपसारखं काम करतात. पेशींच्या विभाजनाच्या वेळी हे टेलोमेर लहान होतात ज्यामुळे प्रोटेक्टिव्ह कॅपची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे या टेलोमर्सची लांबी वारंवार तपासणं गरजेचं आहे कारण यांची लांबी कमी झाली तर पेशी विभाजन थांबू शकतं आणि  पेशी वृद्ध होऊ लागतात. टेलोमर्सला व्यवस्थित कार्य करण्यासाठी कशाची मदत होते यावर वैज्ञानिकांनी संशोधन केलं. यादरम्यान त्यांना आढळलं की, आरएनएचं रूप टेरा (TElomeric Repeat-containing RNA - TERRA) टेलोमरला नियंत्रित करू शकते.  जिथं टेलोमेरसला नियमनाची आवश्यकता असते तेथे टेरा जातात आणि टेलोमर्सना मोठं करण्याची किंवा दुरूस्तीची आवश्यकता असल्याचे संकेत देतात. यात कोणती यंत्रणा टेरांना क्रोमोझोमच्या टोकावर पाठवतं हे मात्र माहिती पडू शकलेलं नाही. हे वाचा - कसं काय शक्य आहे? डोक्याला एकही जखम नाही आणि तिच्या मेंदूत दिसल्या टोकदार वस्तू टेरा हे एक प्रकारचे अणू आहेत ज्यांना नॉन कोडिंग आरएनए म्हटलं जातं.  ज्यांचं प्रथिनांमध्ये रूपांतर होत नाही मात्र, गुणसूत्रांच्या संरचनात्मक घटकांच्या रूपात ते कार्य करतात. अभ्यासादरम्यान वैज्ञानिकांनी टेरा अणूचं मायक्रोस्कोपमधून निरीक्षण केलं. त्यांना आढळलं की आरएनएचा एक छोटासा स्ट्रेच त्याला टेलोमर्सजवळ आणण्यात महत्त्वाचा आहे. टेरा आपल्या आवश्यक स्थानावर पोहोचल्यानंतर अनेक प्रथिनं टेलोमेरससोबत आपली जोडणी करतात, यात RAD 51 नामक प्रथिनं महत्त्वाची भूमिका बजावतात. हे वाचा - आता ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस; Sputnik V च्या ट्रायलला मंजुरी RNA-DNA हायब्रिड मॉलिक्युल तयार करण्यासाठी टेरा टेलोमेरिक डीएनएला चिकटून राहतो आणि हे चिकटून राहण्यात RAD 51 मदत करतो, असं इकोले पॉलिटेक्निक फ्रेडेरेल डी लुसान्ने आणि मासरिक विद्यापीठाच्या वैज्ञानिकांना आढळलं. या आधी फक्त डीएनए रिपेअरमध्ये असं हायब्रिड मॉलिक्युल फॉर्मेशन दिसून आलं होतं आणि टेलोमेर्स रिपेअरमध्ये असं दिसणं हा एक नवा आविष्कार आहे, असं शास्रज्ञ म्हणाले. नेचर जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Health, Serious diseases

    पुढील बातम्या