मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Human body : मानवी शरीरात सापडला एक नवा अवयव; काय करतो कार्य पाहा

Human body : मानवी शरीरात सापडला एक नवा अवयव; काय करतो कार्य पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

या शतकातला सर्वात मोठा शोध असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

    बर्न, 25 डिसेंबर : आधुनिक युगात मानवी शरीराची (Human Body) अंतर्बाह्य माहिती मानवाला झाली असली, तरी आजही अनेक बाबी अज्ञात आहेत. त्यावर संशोधन (Research) सुरू आहे. अशाच एका संशोधनातून शरीरातल्या एका अज्ञात भागाचं गूढ उलगडलं आहे. यापूर्वी मानवी शरीरात असा भाग असल्याचा उल्लेख आढळला नव्हता (New part found in human body). स्वित्झर्लंडमधल्या (Switzarland) संशोधकांनी (Scientists) हा भाग शोधून काढला असून, हा या शतकातला सर्वांत मोठा शोध असल्याचा दावा केला आहे.

    मानवी शरीरात आढळलेला हा नवीन भाग जबड्याच्या मासेटर स्नायूच्या (Masseter Muscle) खोल थरात आढळतो. मासेटर स्नायूच जबड्याचा खालचा भाग वर उचलून घेतात आणि अन्न चघळण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. मॉडर्न अॅनाटॉमीच्या पाठ्यपुस्तकात (Modern Anatomy Text Book) मासेटरच्या खोलवरचा आणि अगदी वरचा असा दोन थरांचा उल्लेख आहे; मात्र हा तिसरा थर आता सापडला आहे.

    झी न्यूजने WION वेबसाइटचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, अॅनल्स ऑफ अॅनाटॉमी या सायन्स जर्नलच्या ऑनलाइन आवृत्तीमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे.  हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, की ऐतिहासिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळला होता. त्यामुळे त्यांनी जबड्याच्या स्नायूंमध्ये लपलेला हा अवयव शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांनी 12 मानवी मृतदेह फॉर्माल्डिहाइडमध्ये जतन केले आणि त्या मृतदेहांच्या डोक्याचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना धक्कादायक निष्कर्ष आढळले.

    हे वाचा - Thyroid: थायरॉईडची औषधं तुम्हीही घेताय? मग या गोष्टी सर्वात अगोदर जाणून घ्या

    प्राचीन ग्रंथात सांगितलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक वेगळा भाग त्यांना दिसला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी 16 ताज्या मृतदेहांचं सीटी स्कॅन केलं आणि त्यांची तुलना जिवंत माणसाच्या एमआरआय स्कॅनशी केली. यादरम्यान त्यांना जबड्याच्या स्नायूंमध्ये हा तिसरा थर दिसला. हा खोल थर झायगोमॅटिक (zygomatic) प्रक्रियेतून तयार होतो. याच प्रक्रियेमुळे गालांची मऊ हाडं घट्ट होतात. गालाच्या मागच्या बाजूस हे स्नायू असतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

    स्नायूचा हा खोल भाग पूर्वीपासून ज्ञात असलेल्या दोन थरांपेक्षा पूर्णपणे वेगळा असून, हा थर खालच्या जबड्याला स्थिर करण्यास मदत करतो, असं स्वित्झर्लंडमधल्या बासेल विद्यापीठाच्या बायोमेडिसिन विभागातल्या लेक्चरर आणि शोधनिबंधाच्या लेखिका स्झिल्व्हिया मेझी यांनी सांगितलं.

    हे वाचा - बापरे! तरुणीच्या मानेभोवती फिरायच्या उवा; लेकीची अवस्था पाहून आईने केलं हे काम!

    'गेल्या 100 वर्षांत शरीरशास्त्रीय संशोधन (Anatomical Research) खूप व्यापक प्रमाणात झालं आहे; मात्र तरीही काही बाबी गूढ आहेत. त्यामुळे हा शोध या शतकातील अत्यंत महत्त्वाचा शोध मानला जाऊ शकतो,' असं मत बेसल युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ डेंटल मेडिसिनचे प्रोफेसर आणि डॉ. जेन्स क्रिस्टोफ टर्प (Jens Christoph Turp) यांनी व्यक्त केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Lifestyle