जगातील सर्वात खराब आवाज कोणता? तज्ज्ञांनी शोधला, पाहा तुम्हालाही पटतंय का?

जगातील सर्वात खराब आवाज कोणता? तज्ज्ञांनी शोधला, पाहा तुम्हालाही पटतंय का?

काही आवाज (sound) इतके सुंदर असतात की ते ऐकतच राहावे असे वाटतात. मात्र काही आवाजांचा इतका त्रास होतो की त्यामुळे अगदी राग आणि चीडही निर्माण होते.

  • Share this:

ब्रिटन, 20 ऑक्टोबर : जगभरात अनेक विचित्र आवाज असतात. अनेकांना ते आवाज (sound) आवडतात तर काही जणांना त्याची भीती वाटते. पण जगातील सर्वात खराब आवाज (voice) कोणता याची शास्त्रज्ञांनी एक यादी तयार केली आहे. यामध्ये हे आवाज ऐकल्यानंतर काही जणांना चीड येते तर काहींना राग येतो तर काहींना इरिटेट होते. जास्तीत जास्त लोकांना घाबरवणारे आवाज आवडत नाहीत. पण वैज्ञानिकांनी यासाठी संशोधन केले असता त्यांना आवाजाने आपण आजारी पडू किंवा आपल्या जीवाला धोका आहे असे वाटते अशा आवाजांना लोकं अधिक घाबरत असल्याचं समोर आलं आहे.

ब्रिटनमधील विद्यापीठातील प्रोफेसर ट्रेवर कॉक्स यांच्या संशोधनात माणूस उलटी करताना जो आवाज काढतो तो सर्वात खराब आवाज असल्याचे समोर आले आहे. उलटीचा आवाज आल्यामुळे मनात किळस निर्माण होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा आवाज आवडत नसल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे सर्वात खराब आवाजांमध्ये उलटी पहिल्या क्रमांकावर आहे.

याशिवाय नखांनी फळ्यावर ओरखडणं, लहान मुलांचा रडण्याचा आवाज, लोखंडाचं टेबल फरशीवरून ओढताना होणारा आवाज, तसंच लोखंडावर लोखंड घासणं, खराब आवाजात व्हायोलिन वाजवणं, ड्रिल मशीनचा आवाज, काचेच्या बाटलीवर चाकू घासणं आणि जेवताना होणारा तोंडातील आवाज यांचादेखील या यादीमध्ये समावेश आहे.

हे वाचा - बापरे! लग्नासाठी विचित्र परीक्षा; थेट Whale च्या जबड्यात घालावा लागतो हात

हे सर्व आवाज घर्षण केल्यामुळे निर्माण होतात. या आवाजांचा प्रभाव जाणून घेण्यासाठी मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आलं असता या आवाजांमुळे निर्माण होणाऱ्या भीतीमुळे मेंदूत तयार होणाऱ्या न्यूरॉन्समुळे हे आवाज खराब वाटतात. संशोधनात वैज्ञानिकांना आढळून आलं, दोन प्रकारचे खराब आवाज असतात. एकामध्ये सतत येणाऱ्या आवाजांमुळे व्यक्तीला चीड येते. यामध्ये अलार्म किंवा घोरण्याच्या आवाजाचा समावेश होतो. तर दुसऱ्या प्रकारात मेंदूत नकारात्मकता निर्माण करणाऱ्या आवाजांचा समावेश होतो.

हे वाचा -  Jeans घालू नका आणि घातली तर जास्त धुवू नका; तज्ज्ञांचा सल्ला

काही जणांना विशिष्ट आवाजांमुळे त्रास होत असतो. टेबलावर सतत पेन आपटल्याने निर्माण होणाऱ्या आवाजाचा ज्या व्यक्तींना त्रास होतो, त्या व्यक्तीच्या मानसिक आजाराला मिजोफोनिया म्हणतात. या व्यक्तींच्या मेंदूमध्ये काही आवाजांप्रती विशिष्ट्य भावना निर्माण होते. सिलेक्टिव साउंड सेंसिटिविटी सिंड्रोम सारखाच हा आजार असून यामध्ये आवाजामुळे रागाबरोबरच भीती आणि तणावदेखील निर्माण होतो. त्यामुळे आवाजाबद्दल असणारं विज्ञान सायकोलॉजी आणि बायोलॉजी संबंधित देखील दिसून येतं.

Published by: Priya Lad
First published: October 20, 2020, 7:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading