Home /News /lifestyle /

हिंदू धर्मात का केलं जात मुंडण? अंधश्रद्धा नाही 'हे' आहे वैज्ञानिक कारण

हिंदू धर्मात का केलं जात मुंडण? अंधश्रद्धा नाही 'हे' आहे वैज्ञानिक कारण

हिंदू धर्मात का केलं जात मुंडण? अंधश्रद्धा नाही 'हे' आहे वैज्ञानिक कारण

हिंदू धर्मात का केलं जात मुंडण? अंधश्रद्धा नाही 'हे' आहे वैज्ञानिक कारण

हिंदू कुटुंबात मूल जन्माला येतं, तेव्हा काही महिन्यांनी त्या बाळाचा जावळ अर्थात मुंडन विधी (Mundan Ceremony) केला जातो. या मागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या.

मुंबई, 22 जून: भारतात अनेक धर्मांचे (Religion) नागरिक राहतात. प्रत्येक धर्माचे नियम आणि कायदे वेगवेगळे आहेत. हिंदू धर्मातही अनेक नियम आणि कायद्यांचं (Rules And Regulation) पालन केलं जातं. मग ते बाळाच्या जन्माविषयी असोत, लग्नाविषयी असोत अथवा अंत्यसंस्काराबाबत असोत. प्रत्येक गोष्टीमध्ये विविध विधी आणि चालीरीतींचा विचार केला जातो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, की जेव्हा हिंदू कुटुंबात मूल जन्माला येतं, तेव्हा काही महिन्यांनी त्या बाळाचा जावळ अर्थात मुंडन विधी (Mundan Ceremony) केला जातो. जावळ हा हिंदूंच्या 16 संस्कारांपैकी एक मानला जातो; पण लहान बाळाचं जावळ का काढतात हे तुम्हाला माहिती आहे का? मुलगा झाला तर एका विशिष्ट ठिकाणी येऊन त्याचं जावळ काढू, असा नवस बोलल्याचं आणि तो पूर्ण केल्याचं तुम्ही हिंदू कुटुंबांमध्ये अनेकदा ऐकलं असेल; मात्र सुशिक्षित व्यक्ती याला अंधश्रद्धा (Superstition) मानतात, तर अनेक जण या प्रकाराला लबाडी समजतात; पण जावळ काढण्यामागे शास्त्रीय कारण (Scientific Reason) आहे, हे फार कमी जणांना माहिती असेल. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर बाळाचं जावळ काढणं खूप आवश्यक आहे. यामागे काही कारणं आहेत, तसंच यामागे शास्त्रीय दृष्टिकोनदेखील आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. हेही वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा ही आहेत शास्त्रीय कारणं - नऊ महिने आईच्या उदरात राहून मूल जेव्हा या जगात प्रवेश करतं, तेव्हा त्याच्या डोक्यावर अनेक जीवजंतू असतात. हे जंतू (Germs) आणि बॅक्टेरिया (Bacteria) शाम्पूने स्वच्छ करता येत नाहीत. त्यामुळे बाळाचं जावळ काढलं जातं. यामुळे सर्व जंतू आणि बॅक्टेरिया निघून जातात. - बाळाचं जावळ काढल्यानं त्याच्या शरीराचं तापमानही नियंत्रित होतं. बाळाचं जावळ काढल्यानंतर त्याचे फोड, मुरूम, जुलाब यांसारखे आजार दूर होतात. तसंच त्याचं डोकंदेखील थंड होतं. - जावळ काढल्याने बाळाच्या डोक्यावरचे सर्व केस निघून जातात. यामुळे बाळाच्या थेट डोक्यावर सूर्यप्रकाश पडतो. हा प्रकाश बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतो. यामुळे पेशी (Cells) कार्यान्वित होतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो. त्यामुळे हा विधी बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा म्हणता येईल. - जावळ काढल्यानंतर बाळाला दात (Teeth) येताना त्रास होत नाही, असंदेखील म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे जेव्हा बाळाला दात येऊ लागतात तेव्हा त्याला जुलाबाचा त्रास सुरू होतो. तसंच तापही येतो; पण जावळ काढल्यानंतर दात येताना बाळाला फारसा त्रास होत नाही. त्यामुळे हिंदू धर्मात लहान बाळाचं विधीवत जावळ काढलं जातं.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या