नवी दिल्ली, 22 जानेवारी: जगभरात अनेक लोक असा दावा करतात की, ते अध्यात्मिक शक्तींच्या जोरावर मृतात्म्यांशी संवाद साधतात. शास्त्रज्ञ यामागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत असून, कोणत्या शक्तींच्या आधारे हे लोक मृतात्म्यांशी संवाद साधतात, याचा शोध घेतला जात आहे. आता शास्त्रज्ञांकडून हे जाणण्याचा प्रयत्न केला जात आहे की, का काही लोकं अतींद्रीय श्रवण (clairaudience) या गोष्टीवर विश्वास ठेवतात.
हे जाणण्याचा प्रयत्न
डरहॅम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे की, काही लोक अतींद्रीय शक्तींवर विश्वास ठेवतात. त्याद्वारे ते आपण मृतात्म्यांशी संवाद साधत असल्याचा दावा करतात, प्रत्यक्षात याचा संबंध ऐकण्याची आणि जाणीव होण्याच्या संवेदनशीलतेशी आहे.
कोण असतात हे लोक ?
अतींद्रीय शक्ती असणारे (spiritualist) जे लोक असतात, ते दावा करतात की ते मृत लोकांशी बोलू शकतात. काही लोकांना मृत व्यक्तींचा वावरही जाणवतो; पण या अभ्यासात शास्त्रज्ञांनी जे लोक मृतात्म्यांशी संवाद (clairaudience) साधू शकत असल्याचा दावा करतात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं.
किती जणांचा अभ्यास करण्यात आला
मृतात्म्यांशी संवाद साधण्याचा दावा करणाऱ्या स्पिरिच्युअॅलिस्ट नॅशनल यूनियनच्या 65 लोकांना या अभ्यासात सहभागी करण्यात आलं होतं. दुसऱ्या एका गटात 143 अशा लोकांना सहभागी करण्यात आलं ज्यांनी कधीही अशाप्रकारचा दावा केला नव्हता. पहिल्या गटातील लोकांनी त्यांना विचित्र आवाज ऐकू येत असल्याचा अनुभव येत असल्याचा दावा केला. अगदी लहानपणीदेखील असा अनुभव घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
(हे वाचा-इंग्रजी येत नाही म्हणुन मुलाखत न देता परत आला होता 'हा' अभिनेता ; आहे सुपरस्टार)
या अभ्यासातील निरीक्षणांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे पहिल्या अतींद्रीय शक्ती प्राप्त समूहात निरीक्षण करण्याचा कल आढळला. मानसिक किंवा काल्पनिक अनुभवात रमण्याच्या प्रवृत्तीशी याचा संबंध दिसून आला. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा हे लोक चित्र विचित्र आवाजांचा अर्थ शोधायला लागतात, तेंव्हा ते अतींद्रीय शक्तीच्या दिशेनं आपला कल वाढवू लागतात. माणसाचे अस्तित्व त्याच्या मृत्यूनंतर संपत नाही तर तो आत्माच्या रुपानं कायम राहतं यावर या अतींद्रीय शक्तीचं तत्व आहे
अभ्यास कि वेड
या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. अॅडम पॉवेल यांनी सांगितलं की, लहानपणी आलेल्या काही विचित्र अनुभवांमागचे कारण शोधण्यासाठी मोठेपणी लोक अतींद्रीय शक्तींवर विश्वास ठेवू लागतात. अभ्यास आणि झपाटलेपण यातील स्पर्धेचं हे उदाहरण आहे. मृत व्यक्तींशी संवाद साधण्याचे माध्यम असण्याची विश्वास ही अतीसंवेदनशीलतेतून निर्माण झालेली भावना आहे.
(हे वाचा - WhatsApp Web ही सेफ नाही? गुगल सर्चवर युजर्सचे पर्सनल मोबाईल नंबर लीक)
कसा असतो हा अनुभव
या संशोधनात शास्त्रज्ञांनी मृत आत्म्यांचा आवाज या लोकांच्या माध्यमातून कसा येतो, त्यानंतर त्यांची अवस्था काय असते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अशा अनुभवानंतर या लोकांची संभ्रमावस्था, इतर शक्तीवर विश्वास अशा विविध पैलूंचा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासात असं आढळून आलं की, 44 टक्के लोकांना रोज मृत व्यक्तींचे आवाज (clairaudience) ऐकू येतात. 33 टक्के लोकांनी त्यांना शेवटच्या दिवशी आवाज कमी ऐकू आले असं सांगितलं. 79 टक्के लोकांनी सांगितलं की, असे आवाज ऐकू येणं ही त्यांच्या आयुष्यातील रोजचीच बाब आहे. 65 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांना हे आवाज त्यांच्या आतून ऐकू येतात असं वाटतं. उच्च ग्रहणशक्ती, अशा प्रकारच्या गोष्टींकडे ओढा, यावर विश्वास यामुळं या लोकांना असा अनुभव येतात, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी नोंदवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Scientist