या शाळेत फी ऐवजी मागतात ‘वेस्ट प्लॅस्टिक’, यानंतरच मिळतं शिक्षण

विद्यार्थी नेहमी घरातील टाकाऊ प्लॅस्टिक घेऊन शाळेत जातात. याच्या मोबदल्यात त्यांना मोफत शिक्षण मिळतं.

  • Share this:

अनेक ठिकाणी वापरलेल्या प्लॅस्टिकला कचराच समजलं जातं. मात्र गुवाहटीच्या एका शाळेतील मुलांसाठी या कचऱ्याची किंमत सोन्याहून कमी नाही. याच कारणही खास आहे. शाळेची फी म्हणून प्लॅस्टिक मागितले जाते. प्लॅस्टिक देऊन मुलांना शाळेत शिकायला मिळत आहे. पामोही गावात असलेल्या अक्षरने 2016 पासून ही अनोखी प्रथा सुरू केली. मुलांना मोफत शिक्षा देण्याचा विडा उचलत प्लॅस्टिक मुक्त गाव करण्याचा निग्रहही त्यांनी केला.

विद्यार्थी नेहमी घरातील टाकाऊ प्लॅस्टिक घेऊन शाळेत जातात. याच्या मोबदल्यात त्यांना शिक्षण मिळतं. मुलांकडून घेतलेल्या या टाकाऊ प्लॅस्टिकला रीसायकल करण्याच्या पद्धतीही मुलांना सांगण्यात येतात. मुलांना प्लॅस्टिकसह पर्यावरणाला घातक अशा इतर गोष्टींबद्दलही ज्ञान दिलं जातं. अशा पद्धतीचं अनोखं शिक्षण घेण्यासाठी मुलं शाळेच्या परिसरातही कुठे प्लॅस्टिक मिळतं का ते शोधतात.

शाळेच्या वेबसाइटवर लिहिलं आहे की, अक्षरचा हेतू हा विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक करणं हा आहे. मुलांना आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातून प्लॅस्टिक आणायचं आहे. दररोज आणलेलं टाकाऊ प्लॅस्टिक शाळेच्या रिसायकलिंग सेंटरमध्ये ठेवले जाते. इथेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं शिक्षण दिलं जातं.

मजीन मुख्तार आणि प्रमिता शर्मा यांनी ही अनोखी शक्कल लढवली. मुख्तारला राज्यात शिक्षणाच्या विकासासाठी काम करायचे होते. या कार्यात त्याची मदत टिसची माजी विद्यार्थिनी प्रमिताने केली. जेव्हा दोघांनी शाळा सुरू केली तेव्हा फक्त 20 विद्यार्थी या शाळेत होते. पण आता विद्यार्थ्यांची संख्या 100 च्या वर गेली आहे. यांच्यासाठी सात शिक्षकही आहेत. या शाळेत चौथ्या वर्षापासून ते 15 वर्षांपर्यंत आणि पहिल्या इयत्तेपासून ते नववीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात. संस्थापकांच्या मते, जेव्हा त्यांना कळलं की इथले लोक प्लॅस्टिक जाळून हात शेकतात तेव्हा त्यांन धक्का बसला. त्यावेळी त्यांना अशा पद्धतीच्या शाळेची कल्पना सुचली.

सुरुवातीला या शाळेत मुलांना पाठवायला पालक तयार नसायचे. कारण गरीब परिसरात मुलंही कमवतात. गरीब मुलांवर खर्चाचं अतिरिक्त ओझं होणार नाही याची शाळेने योग्य व्यवस्था केली. संस्थापकांच्या मते, प्रत्येक मुलाला आठवड्याला 25 टाकाऊ प्लॅस्टिकच्या वस्तू आणणं आवश्यक असतं. या वस्तू शाळेत रिसायकल कशा करायच्या त्या शिकवल्या जातात. (तुलिका देवीचा रिपोर्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या