पालकांनो, बदामासह मुलांना गुलाबही द्यायला विसरू नका

पालकांनो, बदामासह मुलांना गुलाबही द्यायला विसरू नका

गुलाबाच्या फुलामुळे बुद्धी तल्लग होते, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

  • Share this:

गुलाब (rose) ज्याला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण एकमेकांना गुलाब देतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? गुलाबाने फक्त तुम्ही प्रेम व्यक्त नाही करू शकत, तर बुद्धी तल्लग करू शकता, शिवाय झोपही चांगली लागते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ फ्रिबर्गच्या (University of Freiburg) च्या संशोधकांनी हा अभ्यास केला साइंटिफिक रिपोर्टसमध्ये (Scientific Reports) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

गुलाबाच्या सुगंधाचे फायदे जाणून घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांवर प्रयोग करण्यात आला. यावेळी अभ्यास करताना किंवा झोपताना गुलाब किंवा गुलाबाची सुगंध असलेली अगरबत्ती लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं संशोधकांना दिसून आलं.

हेदेखील वाचा  - सावधान !  प्रेग्नन्सीमध्ये करू नका ‘ही’ चूक; नाहीतर बाळाला होऊ शकतं फ्रॅक्चर

काय आहे संशोधन?

विद्यार्थ्यांचे 2 गट करण्यात आले.

एका गटाला अभ्यास करताना डेस्कजवळ आणि झोपताना साइड टेबलवर गुलाब ठेवण्यास किंवा गुलाबाच्या सुगंधाची अगरबत्ती लावण्यास सांगितलं.

दुसरा गट सामान्य वातावरणात होता.

हेदेखील वाचा - फॅमिली ट्रिपवर जात आहात, पालकांनो 'ही' काळजी जरूर घ्या

संशोधकांना काय दिसून आलं?

गुलाबाचा सुगंध दैनंदिन जीवनात खूप मोलाची भूमिका बजावतो, असं संशोधकांना दिसून आलं.

संशोधनाचे प्रमुख अभ्यासक जुर्गन कोर्नमीयर यांनी सांगितलं, "जेव्हा अभ्यास करताना किंवा झोपताना गुलाब किंवा गुलाबाची सुगंध असलेली अगरबत्ती लावली तेव्हा 30 टक्के मुलांच्या अभ्यासात सुधारणा दिसली"

त्यामुळे आता परीक्षा जवळ आल्यात. आपल्या मुलाची स्मरणशक्ती वाढावी म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला बदाम खायला देत आहात, तर आता त्यासोबत गुलाबाचं फूलही द्यायला विसरू नका.

First published: February 3, 2020, 8:29 AM IST

ताज्या बातम्या