SBI loan restructuring : घरबसल्या फक्त एका क्लिकवर ओळखा तुम्ही पात्र आहात की नाही

SBI loan restructuring : घरबसल्या फक्त एका क्लिकवर ओळखा तुम्ही पात्र आहात की नाही

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी Loan restructuring ची सुविधा वेबसाईटवरच उपलब्ध करून दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : तुमचं SBI बँकेत अकाऊंट आणि तिथून तुम्ही लोन घेतलं आहे, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. कोरोनाच्या या परिस्थितीत तुमच्या पगारावर परिणाम झाला आहे आणि तुम्हाला तुमचं लोन अकाऊंट रिस्ट्रक्चर (Restructuring of Loan account) करायचं आहे. तर तुमच्यासाठी बँकेन ही सुविधा वेबसाईटवर सुरू करून दिली आहे.

लोन अकाऊंट रिस्ट्रक्चर करायचं असल्यास आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही याची माहिती करून घेण्यासाठी आपलं खातं असलेल्या बँकेत वारंवार जावं लागतं. मात्र आता बँकेच्या वेबसाइटवरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेत जाण्याऐवजी घरबसल्याच तुम्हाला ही सुविधा मिळणार आहे.

यासाठी तुमचं नेट बँकिंग नसलं तरी काहीच हरकत नाही. एसबीआय बँकेच्या वेबसाईटवर हेल्यानंतर तुम्हाला Restructuring of Loan account साठी वेगळं पोर्टल दिसेल. तिथं आपला लोन अकाऊंट नंबर टाकल्यानंतर तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे समजेल. तुम्ही जर तुम्हाला EMI चा कालावधी वाढवून हवा असेल, तर त्याची माहितीदेखील इथं मिळेल.

हे वाचा - पैसे पाठवण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून भरावा लागणार कर, वाचा काय आहेत नवे नियम

3,500 पेक्षा अधिक ग्राहकांनी या पोर्टलचा वापर केला आहे. त्यापैकी 111  जण पात्र आहेत, असं SBI चे मॅनेजिंग डायरेक्टर सीएस शेट्टी यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: September 21, 2020, 7:22 PM IST
Tags: loanSBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading