Sawan 2019: ...म्हणून श्रावणात महिला हिरव्या रंगाचे कपडे घालतात

Sawan 2019: ...म्हणून श्रावणात महिला हिरव्या रंगाचे कपडे घालतात

श्रावणातच हिरवा रंग जास्तीत जास्त घालण्याला प्राधान्य का दिलं जातं याबद्दल फार कमी लोकांना माहीत असतं.

  • Share this:

Sawan 2019: श्रावणात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. पावसामुळे झाडांवर पानांची हिरवी चादर पसरलेली असते. हा महिना शंकराला समर्पित केलेला असतो असं म्हटलं जातं, त्यामुळेच अनेकजण या महिन्यात शंकराची आराधना करतात. निसर्गाच्या रंगाप्रमाणे महिलाही या महिन्यात हिरवा रंग घालणं पसंत करतात. फक्त कपडेच नाही तर बांगड्या आणि टिकलीही हिरव्या रंगाची घालतात. पण श्रावणातच हिरवा रंग जास्तीत जास्त घालण्याला प्राधान्य का दिलं जातं याबद्दल फार कमी लोकांना माहीत असतं. आज आम्ही तुम्हाला याच कारणांबद्दल सांगणार आहोत.

आनंदाचं प्रतीक- हिरवा रंग हा आनंदाचा प्रतीक आहे. श्रावणात लग्न झालेल्या महिला घरच्या आनंदासाठी आणि घरात शांती नांदावी यासाठी हिरव्या रंगाचे कपडे आणि हिरवा चुडा घालते.

बुध ग्रहाशी संबंधित- काही धर्म ग्रंथात बुध ग्रहाला हिरव्या रंगाचं स्वामी मानलं आहे. असं मानलं जातं की, ज्या मनुष्याच्या राशीत बुध ग्रह कमकूवत असतो त्याने हिरवा रंग घालावा. यामुळे त्याच्या आयुष्यातील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते. याशिवाय ज्यांना मूल होण्याची इच्छा असते त्यांची इच्छा पूर्ण होते.

चांगल्या नशीबासाठी- असं म्हटलं जातं की, शंकराला हिरवा रंग सर्वात जास्त आवडतं. श्रावण महिना हा शंकराला समर्पित केलेला असल्यामुळे महिला शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवऱ्याच्या दीर्घायूसाठी हिरव्या रंगाचे कपडे घालण्याला प्राधान्य दिलं जातं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

...म्हणून बुद्धाने शिष्याला खराब झऱ्यातून पाणी आणायला सांगितलं, ही गोष्ट वाचाच!

डायबेटिस नियंत्रणात राखण्यासाठी करा ही पाच योगासनं!

तुम्हाला विसरण्याची सवय आहे का, मग हे पाच पदार्थ खा!

VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

First published: August 11, 2019, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading