मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सणासुदीला ऑनलाइन शॉपिंग करताय? या टीप्स वापर अन् भरपूर पैसे वाचवा

सणासुदीला ऑनलाइन शॉपिंग करताय? या टीप्स वापर अन् भरपूर पैसे वाचवा

सणासुदीला ऑनलाइन शॉपिंग करताय?

सणासुदीला ऑनलाइन शॉपिंग करताय?

दिवाळी सणासाठी तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडणार असाल तर या टीप्स तुमचे भरपूर पैस वाचवतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 ऑक्टोबर : दिवाळी सण काही दिवसांवर आल्याने अनेकजणांची शॉपिंग करण्यासाठी घाईगडबड सुरू झाली आहे. सणासुदीच्या काळात घरगुती कामासोबत खरेदी करणे थोडे कठीण होऊन बसते. अशा स्थितीत अनेकवेळा सणासुदीची खरेदी नीट करता येत नाही. या सणासुदीच्या हंगामात तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या खरेदीही करू शकता. ऑनलाइन शॉपिंग तुम्हाला खूप चांगल्या ऑफर्स देत आहे. तुम्ही थोडं डोकं वापरलं तर ऑनलाईन शॉपिंग करुन तुम्ही मोठी बचत करू शकता.

रिसर्च महत्त्वाचा..

ऑफर्स येण्यापूर्वीच आपण खरेदी करणार असलेल्या वस्तू कार्टमध्ये सेव्ह करुन ठेवा. यावेळी त्यांच्या किमती लिहून ठेवण्यास विसरू नका. अथवा त्याच्या किमतीचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवा. ज्यावेळी ऑफर्स सुरू होतील, त्यावेळी किमतीतील फरक तुमच्या लक्षात येईल. अनेकदा कंपनी किंमत वाढवून मग डिस्काऊंट देतात. त्यामुळे दिसताना आपल्याला चांगली डील वाटते. मात्र, प्रत्यक्षात आपण त्याच किमतीत वस्तू खरेदी करतो.

विनामूल्य शिपिंगसह प्रॉडक्ट ऑर्डर करा

ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असे केल्याने तुम्ही सहजपणे भरपूर पैसे वाचवू शकता. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या मोफत शिपिंगसह प्रॉडक्ट देखील ठेवतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचे भरपूर पैसे वाचवू शकता.

ऑफरमधील उत्पादन खरेदी करा

सणादरम्यान तुम्हाला सर्व ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलती दिल्या जातात. अशा स्थितीत तुम्ही ऑनलाइन ऑफर असणारी उत्पादने खरेदी करू शकता. ऑफरवर उत्पादने खरेदी करून तुम्ही सहजपणे बरेच पैसे वाचवू शकता.

वाचा - दिवाळीला भेसळयुक्त मिठाई तर खेरदी करत नाही ना? असे ओळखा बनावट पदार्थ

प्रॉडक्टटा रिव्ह्यू चेक करा

कोणतेही उत्पादन ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, आपण त्याचा रिव्ह्यू तपासला पाहिजे. जर तुम्ही रस्त्यावरून खरेदी केली तर खराब उत्पादन परत करू शकत नाही. मात्र, तुम्ही ऑनलाइन खरेदी केल्यास ते कधीही रिटर्न करू शकता.

कॅशबॅक ऑफर शोधा

ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे कॅशबॅक कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे कूपन कोड असल्यास तुम्ही सहज कॅशबॅक घेऊ शकता. तुमच्याकडे कोणताही कूपन कोड नसेल तर तुम्हाला ऑनलाइन थोडा रिसर्च करावा लागेल. तुम्हाला अनेक कॅशबॅक कूपन किंवा कूपन कार्ड ऑनलाइन मिळू शकतात. विशेषत: सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्हाला अनेक कॅशबॅक मिळतात.

ईएमआयचा पर्याय वापरा

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही घरी बसून कोणत्याही मदतीशिवाय तुमच्या वस्तूंसाठी सहज ईएमआय करू शकता. व्याजमुक्त EMI योजना निवडण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, तुम्ही दरमहा थोडे पैसे देऊन कोणतीही वस्तू सहज खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही.

First published:
top videos

    Tags: Online shopping, Shopping