Home /News /lifestyle /

Save Electricity Bill: 'या' सोप्या टिप्स वापरा अन् घरबसल्या करा विजेची बचत, वीज बिलही येईल अत्यंत कमी

Save Electricity Bill: 'या' सोप्या टिप्स वापरा अन् घरबसल्या करा विजेची बचत, वीज बिलही येईल अत्यंत कमी

Save Electricity : तुम्ही घरबसल्या विजेची बचत (save electricity) करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स (tips) सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही विजेची बचत करू शकता.

    मुंबई, 21 जानेवारी : विजेच्या (electricity) वापराला दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आता तर घरातील जवळपास सर्वच उपकरणं विजेवर चालणारी असल्याने विजेचा वापर अविभाज्य घटक बनला आहे. पण अनेकदा या उपकरणांच्या वापराने भरमसाठ वीज बिल (electricity bills) येतं. बिलाचा मोठा आकडा पाहून अनेकांना धक्का बसतो. काहीजण तर थेट महावितरणचे कार्यालय गाठून वीज बिल कमी करून देण्याची विनंती करतात. तर, काहीजण मीटरमध्ये दोष (fault) असल्याचे सांगत वीज बिल चुकीचे (bill is wrong) असल्याचे सांगतात. पण तुमच्या घरातील विजेच्या उपकरणांचा (electrical appliances) योग्य पद्धतीने वापर केल्यास, तुम्ही घरबसल्या विजेची बचत (save electricity) करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स (tips) सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही विजेची बचत करू शकता. वीज बचतीच्या टिप्स - वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, पाण्याची मोटार अशी जास्त वीज लागणारी उपकरणं एकाचवेळी वापरू नका. या उपकरणांचा एकाचवेळी वापर केल्याने मीटरवर लोड येतो. महिन्यातून तीन वेळा अशा प्रकारे एकाचवेळी मीटरवर लोड पडल्यास, आपोआप मंजूर भारापेक्षा जास्त भार वीज बिलात जोडला जातो आणि भार वाढला की मीटरचं भाडंही वाढतं. त्यामुळे जास्त वीज लागणारी उपकरणं एकाचवेळी वापरणं टाळा. वाचा : Black Holes ची एकूण संख्या किती आहे माहितेय? संशोधनाने दिलं या प्रश्नाचं उत्तर - घरातील जुने बल्ब आणि ट्युबलाइट बदलून एलईडी बल्ब वापरल्यास वीज बिलात मोठी बचत होते. त्यामुळे जुन्या बल्बच्या जागी एलईडी बल्ब आणि ट्युबलाइट वापरा. तसेच हिवाळ्यात हिटरऐवजी ब्लोअर वापरा. हिटरला खूप वीज लागते. त्यामुळे एकतर किमान वॅटचा हिटर वापरावा, किंवा ब्लोअर वापरा. - दिल्ली-एनसीआरसह अनेक ठिकाणी हिवाळ्यात घराचे तापमान रेफ्रिजरेटरच्या तापमानापेक्षा कमी होते. त्यामुळे दोन तास फ्रीज बंद ठेवा. असे केल्याने फ्रीजमध्ये बर्फही गोठणार नाही आणि विजेचा वापर कमी होईल. वाचा : अंड्यासह खाताय हे पदार्थ? विविध आजारांना द्याल निमंत्रण, वेळीच घ्या काळजी - जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बदलून त्याऐवजी नवीन 5 स्टार रेटिंग असणाऱ्या वस्तूंचा वापर करा. त्यामुळे तुमचं वीज बिल अर्ध्याहून अधिक कमी होईल. स्मार्ट यंत्राचा वापर करून स्मार्ट पद्धतीने वीज बिलाची बचत करावी. आजकाल स्मार्ट बल्ब, स्मार्ट स्पीकर, स्मार्ट कनेक्टर उपकरणं वापरून तुम्ही घराचे वीज बिल कमी करू शकता. वीज ग्राहकांकडून बरेचदा प्रत्यक्ष वापरापेक्षा विजेचे बिल अधिक पाठवण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात येतात. अनेकदा वॉशिंग मशीन, पाण्याची मोटर यासारखी अधिक प्रमाणात वीज लागणारी उपकरणं वापरल्यावर बिल जास्त रकमेचं येतं. त्यामुळे अशा उपकरणांचा वापर कसा व किती करायचा, याचं नियोजन करणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने उपकरणांचा वापर केल्यास विजेत बचत होईल व त्यामुळे वीज बिलदेखील कमी येईल.
    First published:

    Tags: Electricity, Electricity bill

    पुढील बातम्या