...तर होणार थेट तुरुंगात रवानगी, या सरकारचं नवं फर्मान वाचून तुम्हालाही बसेल धक्का

सार्वजनिक सभ्यतेचं जर उल्लंघन केलं तर दंड होऊ शकतो असं फर्मान सरकारने काढलं आहे. या उल्लंघनात सार्वजनिक ठिकाणी घट्ट कपडे घातल्यास तुरुंगात जावं लागू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 08:05 AM IST

...तर होणार थेट तुरुंगात रवानगी, या सरकारचं नवं फर्मान वाचून तुम्हालाही बसेल धक्का

सौदी अरेबियाने नुकतंच टूरिस्ट व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयासोबत त्यांनी अनेक निर्बंधही घातले आहेत. सार्वजनिक सभ्यतेचं जर उल्लंघन केलं तर दंड होऊ शकतो असं फर्मान सरकारने काढलं आहे. या उल्लंघनात सार्वजनिक ठिकाणी घट्ट कपडे घातल्यास तुरुंगात जावं लागू शकतं. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत उघडपणे प्रेम व्यक्त करू शकत नाही.

सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्रालयाने सार्वजनिक सभ्यतेचं  उल्लंघन केलं म्हणून 19 आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. पण यासाठी किती दंड भरावा लागला याची माहिती मिळू शकली नाही. रुढीवादी इस्लाम देशाची अर्थव्यवस्था ही तेलावरच अवलंबून होती. मात्र आता त्यांनी पर्यटकांना देशात येण्याची आणि फिरण्याची परवानगी दिली आहे.

एका वक्तव्यात म्हटले गेले की, पर्यटकांसाठीच्या नव्या नियमांमध्ये पुरुष आणि महिलांना सभ्य कपडे घालणं बंधनकारक असणार आहे. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचं प्रदर्शनही करू शकत नाही. पर्यटकांनी देशातील नागरिकांप्रमाणेच कायदे आणि नियम यांचं पालन करावं यासाठी हे नियम आखण्यात आले आहेत.

मिळेल टूरिस्ट व्हिसा-

सौदी अरेबिया पहिल्यांदा टूरिस्ट व्हिसा देत आहे. शुक्रवारी जागतिक पर्यटन दिवसाचं औचित्य साधून त्यांनीही घोषणा केली. त्याचं झालं असं की, सौदी अरेबियाने त्यांची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी तेलावर अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी राजकुमार सलमान यांनी व्हिजन 2030 कार्यक्रमाचं नियोजन केलं. सौदीने 49 देशांसाठी हा व्हिसा देऊ केला आहे. याआधी सौदी अरेबिया नोकरीसाठी येणाऱ्या लोकांना, त्यांच्या कुटुंबाला आणि मक्का- मदीनाला जाणाऱ्या मुस्लिम भक्तांना व्हिसा देत होते.

Loading...

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 08:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...