#sareetwitter : ट्विटरवर इतक्या वेगाने का व्हायरल होतोय हा 'सारी ट्रेंड'?

सध्या ट्विटरवर एक ट्रेंड वेगाने व्हायरल होतो आहे. त्याचं नाव आहे, #sareetwitter. यामध्ये महिला त्यांचे साडीतले फोटो #sareetwitter या हॅशटॅगसहीत शेअर करतायत. साडीचं सौंदर्य आणि साडी कोणत्याही सोहळ्यामध्ये कशी उठून दिसते यावर बरीच चर्चा सुरू आहे. पण हा ट्रेंड नेमका या गोष्टीनंतर सुरू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 03:40 PM IST

#sareetwitter : ट्विटरवर इतक्या वेगाने का व्हायरल होतोय हा 'सारी ट्रेंड'?

मुंबई, 17 जुलै : सध्या ट्विटरवर एक ट्रेंड वेगाने व्हायरल होतो आहे. त्याचं नाव आहे, #sareetwitter. यामध्ये महिला त्यांचे साडीतले फोटो #sareetwitter या हॅशटॅगसहीत शेअर करतायत. साडीचं सौंदर्य आणि साडी कोणत्याही सोहळ्यामध्ये कशी उठून दिसते यावर बरीच चर्चा सुरू आहे.

हा ट्रेंड सोमवारी सकाळपासूनच सुरू झाला. न्यूयॉर्क टाइम्समध्ये साडीबदद्लचा एक लेख छापून आला होता. यामध्ये साडीची परंपरा, सौंदर्य आणि साडीची शोभा यांचं वर्णन करण्यात आलं होतं.

(वाचा : आता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको!)

यामध्ये साडीचा वाढता ट्रेंड भाजपमुळे सुरू झाला, असं लिहिलं आहे. 2014 मध्ये भाजपनेच साडीचं जोरदार प्रमोशन केलं, असं त्यांनी यात म्हटलं आहे. पण भारतातले लोक याच्याशी सहमत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये निवडणूक लढवनूनही कधीच बनारसी साडी विणणाऱ्या विणकरांकडे लक्ष दिलं नाही. त्यांची परिस्थिती अजून दयनीयच आहे. या लेखानंतर ट्विटरवर #sareetwitter हा ट्रेंड सुरू झाला.

यामध्ये स्टार्सपासून ते सामान्य महिलांपर्यंत सगळ्याजणी आपले साडीतले फोटो शेअर करत आहेत. पत्रकार, राजकीय नेत्याही यात मागे नाहीत. हे आहेत ट्विटरवरचे गाजलेले साडीतले फोटो :

Loading...

==================================================================================================

पाहा VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-391640" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzkxNjQw/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2019 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...