Home /News /lifestyle /

‘शेरनी’च्या साडी लुक पुढे सगळ्या अभिनेत्री फिक्या; याची किंमत ऐकून बसेल धक्का

‘शेरनी’च्या साडी लुक पुढे सगळ्या अभिनेत्री फिक्या; याची किंमत ऐकून बसेल धक्का

विद्याचं साडी प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे.

विद्याचं साडी प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे.

साडीप्रेमी विद्या बालनचा (Actress Vidya Banal) हा साडी लुक viral होतोय. विद्याने नेसलेली साडी राजदीप राणावतच्या क्लोदिंग लेबलची डबल शेड रेशीम बॉर्डरसह साडीप्रेमी विद्या बालनने (Actress Vidya Balan) राजदीप राणावतच्या क्लोदिंग लेबलची डबल शेड रेशीम बॉर्डरसह डिझायनर साडी आहे. साडीची किंमत काय आहे पाहा जरा..

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली,1 जुलै : बॉलिवूड एक्ट्रेस आपल्या फॅशनेबल  (vidya Balan Fashion) कपड्यांमुळे चर्चेत असतात. त्या स्वत: देखील आपले फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. अभिनेत्री विद्या बालनसुद्धा (Actress Vidya Balan) आपले सुंदर फोटो पोस्ट करत असते. पण, विद्याचं साडी प्रेम (Saree Lover) तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तिचे बरेचसे फोटो साडीतच असतात. अवॉर्ड शो असो किंवा एखादी पार्टी विद्याला साडी घालायला आवडते. एक अभिनेत्री म्हणून विद्याने स्वत:ला सिद्ध केलंच आहे. तर, साडी प्रेमामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा फॅशन मधलं स्वत:चं वेगळेपणही ती दाखवते. कॉटन, कांजिवरम, हॅन्डलूम, शिफॉन अशा विविध प्रकारच्या साड्या तिच्याकडे आहे. वर्षातल्या 365 दिवसांसाठी विद्या 300 साड्या विकत घेते. आता सोशल मीडियावर विद्याचे फोटो व्हायरल (Viral Photos) झालेत. ज्यात विद्या बालनने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. सफिया रेशीम साडी ऑफ-व्हाइट आणि सोनेरी रंगात उझ्बेक इकत मोटिफसह डिझाईन केलेली आणि डबल शेड रेशीम बॉर्डरसह डिझाईन केली आहे. राजदीप राणावतच्या क्लोथिंग लेबलची ही साडी आहे. यासाडी सोबत विद्याने मरून कलरचा प्रिन्टेड ब्लाऊज घातलाय, ज्याला क्रू नेकलाइन दिली गेली  आहे. तर, साडीच्या पदरावर केलेलं काम साडीला आणखी चांगला लूक देत आहे. कपाळावर छोटीशी बिंदी, मोठे कानातले आणि हिरवे स्टोन असलेला एक चोकर नेकलंस तिने घातलाय. पण, या साडिची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. विद्याची ही साडी 44,800 रुपयांची आहे. सध्या विद्या ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझोनवरच्या तिच्या ‘शेरनी’ मुळे चर्चेत आहे. सत्य घटनेवर आधारीत शेरनीमुळे विद्याच्या अभिनयाला दाद मिळते आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actress, Fashion, Instagram, Viral photo

    पुढील बातम्या