वॉशिंग्टन, 23 डिसेंबर : ख्रिसमस (Christmas) तोंडावर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस म्हणजे सांता क्लॉज (Santa Claus) आलाच. चिमुरडे आपल्या फेव्हरेट सांता क्लॉजची वाट पाहत आहेत. सांता क्लॉज आपल्यासाठी गिफ्ट आणणार याची उत्सुकता आहे. असाच एक सांता आपली आतुरतेने वाट पाहणाऱ्या या चिमुरड्यांना गिफ्ट द्यायला निघला आणि स्वत:च अडकला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) झाला आहे. ही घटना आहे कॅलिफोर्नियातील. आकाशातून उडत येत असलेला एक सांता क्लॉज हवेतच लटकला. इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा हा सँटा स्वतच संकटात सापडला आणि त्याला दुसऱ्याची एखाद्या सँटाची वाट पाहावी लागली.
अग्निशमन दलानं आपल्या ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. एक व्यक्ती सांता क्लॉजचा ड्रेस घालून पॅराग्लायडिंग करत होती. आकाशातून ती येत होती. इतक्यात समोर भला मोठा विजेचा खांब आणि त्याच्या तारा. विजेच्या तारांमध्ये सांता अडकला. हे वाचा - लठ्ठ होऊ म्हणून घाबरली इन्स्टाग्राम स्टार; सडपातळ झाली आणि जीवच गमावला सुदैवानं या सांताला कोणतीही दुखापत झालेली नाही. त्याने विजेच्या तारेपासून स्वतःचा बचाव केला. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी विजेच्या खांबवर चढून तारांमधून सांताची सुटका केली. त्याला क्रेनच्या मदतीनं खाली उतरवण्यात आलं आहे. "रिओ लिंडामध्ये सांता त्याचा रस्त भरकटला. पण अग्निशमम दलानं तो उशिरा पोहोचणार नाही यात काळजी घेतली", असं ट्विट केलं आहे. हे वाचा - माकडाच्या हाती पैशांची बॅग, झाडावरुन फेकल्या लाखो रुपयांच्या नोटा; पाहा VIDEO आकाश आणि जमीन यांच्या मध्येच लटकल्यानंतर सांतालाही चांगलीच धडकी भरली होती. आकाशातून जमिनीवर येताच त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि चिमुरड्यांना गिफ्ट देण्यासाठी तो पुन्हा सज्ज झाला आणि आपल्या मार्गानं निघाला.In #RioLinda today #Santa may have lost his way but #MetroFire, @SacFirePIO & @SMUDUpdates made sure he was not long delayed.
W/o a scratch & full of good cheer we made sure Old St. Nick will use his reindeer when he sees you later this year. #MerryChristmas & #HappyHolidays pic.twitter.com/Tl3vNFzhZm — Metro Fire of Sacramento (@metrofirepio) December 21, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos