उटावा, 14 एप्रिल : सध्या कोरोनाविरोधातील
(Coronavirus) सर्वात मोठं शस्त्र आहे ते लस. जगभरात लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. दरम्यान आता लशीनंतर कोरोनाविरोधात आणखी एक मोठं शस्त्र सापडलं आहे, ते म्हणजे SaNOtize स्प्रे
(SaNOtize Nasal spray). जो कोरोनाचा नाकातच
(Coronavirus nasal spray) खात्मा करेल. जवळपास 99.99 कोरोनाव्हायरस नाकातच नष्ट होईल, असा दावा केला जातो आहे.
सॅनोटाइझ ही कॅनडातील कंपनी आहे. या कंपनीने कोरोनासाठी एक स्प्रे तयार केलं आहे. नाकावाटे घेता येणारा हा स्प्रे. हा स्प्रे नाकात टाकल्याने कोरोनाव्हायरसचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी होतं, असं कंपनीनं सांगितलं आहे. द सनच्या रिपोर्टनुसार हा स्प्रे 99.99 व्हायरस नष्ट करतो तसंच व्हायरस पसरण्यापासूनही रोखतो.
हे वाचा - भारतातील तिसरी कोरोना लस आहे तरी कशी? जाणून घ्या Sputnik V बाबत सर्व काही
अमेरिका आणि ब्रिटनमध्ये या स्प्रेची लॅब टेस्ट झाली आहे. त्यानुसार वायुमार्गातील वरच्या भागातच हा स्प्रे व्हायरस नष्ट करतो आणि त्याला वाढण्यापासून तसंच फुफ्फुसात जाण्यापासून रोखतो. ज्या रुग्णांसाठी हा स्प्रे वापरण्यात आला त्यांच्यात 24 तासांत सरासरी व्हायरल रिडक्शन 1.362 राहिलं. टक्केवारीचा विचार करता जवळपास 95 टक्के व्हायरस कमी झाला. तर 72 तासांत व्हायरल लोड 99 टक्क्यांपेक्षाही जास्त कमी झाला.
या स्प्रेचं ब्रिटनमध्ये ट्रायल घेणारे प्रमुख अभ्यासक डॉ. स्टिफन विन्चेस्टर यांंनी सांगितलं, हे खूप क्रांतिकारी आहे आणि कोरोना महासाथीच्या जागतिक युद्धात मोठं यश मिळेल, असा विश्वास मला आहे.
हे वाचा - देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच;या शहरात दर दुसऱ्या मिनिटाला एक व्यक्ती कोरोनाग्रस्त
या स्प्रेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचाराचा कालावधीसुद्धा लवकर कमी होईल. तर गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांची प्रकृतीही सुधारेल, असं कंपनीने सांगितलं. दरम्यान भारतातही कोरोनावर उपचारासाठी अश नेझल स्प्रे तयार होत आहे. कोरोना लस कोवॅक्सिन तयार करणारी कंपनी भारत बायोटेकने कोरोफ्लू नावाचं औषध तयार केलं आहे, जे इंजेक्शनऐवजी नाकावाटे घेता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.