Home /News /lifestyle /

आज आहे 2022 मधील पहिली संकष्टी चतुर्थी, गणेश पूजा करताना अजिबात विसरू नका या गोष्टी

आज आहे 2022 मधील पहिली संकष्टी चतुर्थी, गणेश पूजा करताना अजिबात विसरू नका या गोष्टी

प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankasht Chaturthi) असं म्हणतात. त्या दिवशी उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. आज वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

पुढे वाचा ...
मुंबई, 21 जानेवारी: भारतीय संस्कृतीत (Indian culture) गणरायाची आराधना, उपासना, नामस्मरण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही पूजनाची किंवा शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने (Ganpati pujan) केली जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankasht Chaturthi) असं म्हणतात. त्या दिवशी उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. हे व्रत कोणालाही करता येतं. उत्तर भारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगानुसार सध्या माघ महिना सुरू आहे. या पंचांगानुसार माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला सकट चौथ असं म्हणतात. उत्तर भारतात सकट चौथचं व्रत श्री गणेशाच्या आराधनेसाठी केलं जातं. यंदा सकट चौथ आज 21 जानेवारी 2022 रोजी आहे. त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या पंचांगानुसार पौष महिन्यातली संकष्ट चतुर्थी आहे. सकट चौथचं व्रत करताना (worshiping) करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते. 2022 या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येत आहे. मराठी दिनदर्शिका आणि पंचागाप्रमाणे ही पौष कृष्ण चतुर्थी. पण याच दिवशी उत्तर भारतात सकट चौथचं व्रत करतात आणि तेही गणेश आराधनेसाठीच. उत्तर भारतात विक्रम संवत्सराप्रमाणे कालगणना होते.  21 जानेवारीला या त्यांच्या पंचांगानुसार माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला सकट चौथ असं म्हणतात. हे वाचा-सूर्याकडे पाहताच येते शिंक; Sun Sneezing मागे आहे शास्त्रीय कारण सकट चौथला अनेक जण तिलकुट चौथ (Tilkut Chauth) असंही म्हणतात. या दिवशी आई तिच्या मुलांसाठी उपवास ठेवते आणि संध्याकाळी चंद्राला ( moon) अर्घ्य अर्पण करून उपवास सोडते. तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू सकट चौथला बनवल्या जातात व त्या गणपतीला अर्पण केल्या जातात. ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते, 'या दिवशी गणपतीची पूजा करताना काही नियमांचं पालन केलं पाहिजे. जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांमुळे उपासनेचं आणि व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही.' सकट चौथच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून लाल वस्त्र परिधान करावं. यानंतर गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवावी. दिवसभर उपवास करावा. रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करावे, गणेशाची पूजा करावी आणि नंतर फलाहार करावा. शक्य असल्यास यामध्ये गोडच खावं. मीठही न खाण्याचा प्रयत्न करावा. या दिवशीच्या पूजेमध्ये गणेश मंत्राचा जप खूप फलदायी असल्याचं सांगितलं जातं. गणेश मंत्राचा जप करताना गणपतीला 21 दूर्वा अर्पण करणंदेखील खूप शुभ आहे. गणपतीला लाडू खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी बुंदीचे लाडू गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. लाडूंव्यतिरिक्त ऊस, रताळे, गूळ, तिळापासून बनवलेले पदार्थ, गूळ आणि तुपाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवणं शुभ मानलं जातं. हे वाचा-Kundali Gun Milan: लग्नासाठी कोणते असतात 36 गुण? इतके गुण जुळले तरच करा शुभमंगल! 'या' गोष्टी लक्षात ठेवा - पूजा करताना गणपतीला तुळशीची मंजिरी किंवा पान अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार, गणपतीने तुळशीचा विवाह प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर तुळशीने गणपतीला दोन लग्नांचा शाप दिला, तर गणरायाने तुळशीला राक्षसाशी लग्न होईल, असा शाप दिला. त्यामुळे गणेशपूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. - पाण्यात दूध आणि अक्षता मिसळून सकट चौथला चंद्राला अर्घ्य अर्पण केलं जातं. परंतु अर्घ्य अर्पण करताना, ते पाणी पायावर पडणार नाही, याची काळजी घ्या. - महिलांनी उपवास करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ असतं. - सकट चौथचं व्रत करत असाल तर गणपतीचं वाहन असलेल्या उंदराला या दिवशी चुकूनही त्रास देऊ नये. - या दिवशी केलेलं पूजन शुभ मानलं जातं. व्रत करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
First published:

पुढील बातम्या