मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पत्नी मान्यताने शेअर केला कॅन्सरग्रस्त संजय दत्तचा PHOTO; केली भावुक पोस्ट

पत्नी मान्यताने शेअर केला कॅन्सरग्रस्त संजय दत्तचा PHOTO; केली भावुक पोस्ट

संजय दत्त (sanjay dutt) सध्या फुफ्फुस कॅन्सरवर (Lung cancer) मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे.

संजय दत्त (sanjay dutt) सध्या फुफ्फुस कॅन्सरवर (Lung cancer) मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे.

संजय दत्त (sanjay dutt) सध्या फुफ्फुस कॅन्सरवर (Lung cancer) मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) फुफ्फुसाचा कॅन्सरशी लढा देतो आहे. 11 ऑगस्ट 2020 संजयने आपल्याला फुफ्फुस कॅन्सर असल्याची माहिती दिली. सध्या त्याच्यावर मुंबईतच उपचार सुरू आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याचा फोटो समोर आला आहे.

संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने (Maanyata Dutt) आपल्या सोशल मीडियावर संजयचा फोटो शेअर केला आहे. शिवाय दत्त कुटुंब या परिस्थितीचा कसा सामना करत आहे, हेदेखील तिनं सांगितलं आहे.

मान्यताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये संजयने काळा गॉगल घातला आहे आणि हाताची घडी घालून तो उभा आहे. हा फोटो त्याच्या घरातील असल्याचं समजतं आहे. या फोटोसह मान्यताने कॅप्शनमध्ये दत्त कुटुंबं कोणत्या परिस्थितीतून जात आहे, त्याबाबत सांगितलं आहे. तिनं एका गाण्याच्या ओळीने याची सुरुवात केली आहे.

"रुक जाना नहीं तू कहीं हार के... कांटों पे चलके मिलेंगे साए बहार के!! आपल्याला आपल्या आयुष्यात वाईट दिवसांचा सामना करत चांगले दिवस कमावायचे आहे. कधीच हरू नको" अशी पोस्ट करत मान्यताने #inspiration #courage #strength #love #grace #positivity #dutts #challenging Yet #beautifullife #thankyougod असे हॅशटॅग देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे वाचा - तेलुगू सुपरस्टारच्या मुलीने अशी म्हटली मराठी आरती, VIDEO व्हायरल

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची कोरोना चाचणीसुद्धा झाली. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 11 ऑगस्टला  संजय दत्तला तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं.

हे वाचा - अखेर रियाने ड्रग्सबाबत दिली कबुली; बॉलिवूड पार्टींबाबतही केला मोठा खुलासा

संजय दत्त आणि परिवारासाठी हा कठीण काळ आहे. याआधीही संजय आणि त्याच्या परिवाराने कठीण प्रसंगाशी सामना केला आहे. संजयने नेहमी या परिस्थितीशी धैर्याने सामना केला आहे. हा काळ देखील निघून जाईल, संजयला देवाने पुन्हा एकदा एका परीक्षेसाठी निवडले आहे आणि यामध्ये संजय जिंकेल, अशी भावना त्याची पत्नी मान्यताने संजयला कॅन्सरचं निदान होताच व्यक्त केली होती. तर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी संजय दत्तने ट्विट करून माझ्यासाठी प्रार्थना करा, अशी भावुक पोस्ट केली होती.

First published:

Tags: Cancer, Health, Sanjay dutt