Home /News /lifestyle /

पहिल्यांदाच एक भारतीय BATA चा बॉस; ग्लोबल CEO बनले संदीप कटारिया

पहिल्यांदाच एक भारतीय BATA चा बॉस; ग्लोबल CEO बनले संदीप कटारिया

126 वर्षांत पहिल्यांदाच एक भारतीय BATA चा इंटरनॅशनल CEO झाला आहे.

    नवी दिल्ली, 01 डिसेंबर  : फूटवेअर क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बाटा शू ऑर्गनायझेशन (Bata shoe Organization) कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संदीप कटारिया (sandeep kataria)  यांची जागतिक स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. याबाबत 30 नोव्हेंबरला घोषणा करण्यात आली. टॉमस बाटा यांनी मोठ्या कष्टाने या कंपनीची उभारणी केली असून, एकेकाळी कंपनीच्या कर्जामुळे दिवाळखोरीत गेलेल्या या व्यक्तीने मजुरी करून कंपनीला पुनःवैभव प्राप्त करून दिलं. बाटा कंपनीत जागतिक पदावर काम करणारे संदीप कटारिया हे पहिले भारतीय ठरले आहेत. एलेसिक्स नसार्ड यांच्या जागी कटारिया यांची निवड करण्यात आली आहे. 2017 मध्ये बाटा इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कटारिया रुजू झाले होते. येथूनच त्यांचा या कंपनीतील प्रवास सुरू झाला होता. कोण आहेत संदीप कटारिया? आयआयटी दिल्ली (IIT DELHI) येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या संदीप कटारिया यांनी 1993 मध्ये एक्सएलआरआय (XLRI) मधून पीजीडीबीएम पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यांना कामाचा सुमारे 24 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी भारत आणि युरोपमध्ये युनिलिव्हर (Unilever), यूम ब्रॅण्डस (YUM Brands) आणि व्होडाफोन (Vodaphone) या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. बाटा इंडियामध्ये येण्यापूर्वी ते व्होडाफोन इंडियामध्ये मुख्य वाणिज्य अधिकारीपदावर कार्यरत होते. जुलै 2017 मध्ये कटारिया बाटा इंडियात रुजू झाले. दोन वर्षांनंतर त्यांना विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. कटारिया यांच्या नेतृत्वात बाटा इंडिया कंपनीचा नफा दुपटीनं वाढला. त्यांनी बाटाची उत्पादनं नवीन शैलीत सादर केल्यानं युवकवर्ग मोठ्या प्रमाणात या उत्पादनांकडे आकर्षित झाला. 2019-20 मध्ये बाटा इंडियाचा निव्वळ नफा 327 कोटी रुपये तर महसूल 3053 कोटी रुपये राहिला. स्वातंत्र्यापूर्वी भारतात सुरू केला पहिला कारखाना बाटा ही शूजनिर्मिती करणारी भारतातील एक प्रमुख कंपनी आहे. सुमारे 90 वर्षांपूर्वी या कंपनीनं भारतात पाऊल ठेवले. बाटाने आपला पहिला कारखाना पश्चिम बंगालमधील कोन्नागर येथे सुरू केला. जो नंतर बाटागंज येथे स्थलांतरित झाला. त्यानंतर फरिदाबाद (हरियाणा), पिनया (कर्नाटक) आणि होसूर (तामिळनाडू) येथील कंपन्यांसह एकूण पाच कंपन्या सुरु झाल्या. यासर्व ठिकाणी लेदर, रबर, कॅनव्हास आणि पीव्हीसीपासून स्वस्त, भक्कम आणि आरामदायी शूज बनवले जातात. बाटा हा मध्यमवर्गीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एक प्रमुख शूज ब्रॅण्ड ठरला आहे. अशी झाली बाटाची उभारणी बाटा ही चेक रिपब्लिक देशातील कंपनी आहे. टॉमस बाटा यांनी 1894 मध्ये ही कंपनी सुरू केली. रबर आणि लेदरच्या शोधात ही कंपनी भारतात दाखल झाली. 1939 मध्ये कोलकाता इथं कंपनीचं कामकाज सुरू झालं. बाटानगरमध्ये या कंपनीनं देशातील पहिलं शूजनिर्मिती यंत्र बसवलं. आज भारत हा बाटाचा दुसऱ्या क्रमाकांचा बाजार आहे. बाटाची देशभरात 1375 किरकोळ विक्रीची दुकानX (Stores) आहेत. यात सुमारे 8500 कर्मचारी कार्यरत आहेत. यंदा कंपनीने सुमारे 5 कोटी शूजची विक्री केली आहे. 90 देशांमध्ये कंपनीचे कामकाज चालते. कंपनीत सुमारे 30 हजार कर्मचारी कार्यरत असून कंपनीची 5000 दुकाने आहेत. दिवाळखोर मजूर बनला कंपनीचा मालक चेकोस्लोव्हाकिया या युरोपियन देशातील ज्लिन या एका छोट्याशा गावात बाटा कुटुंब चपलांची निर्मिती करून आपला उदरनिर्वाह  करत होते. संघर्षमय स्थितीत अशीच अनेक वर्षे लोटली. टाॅमस यांच्यामुळे 1894 मध्ये कुटुंबाचं चित्रच पालटलं. शूजनिर्मितीच्या आपल्या पारंपारिक उद्योगाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी टाॅमस यांनी आपली बहीण एन्ना आणि भाऊ एन्टोनिन यांची मदत घेण्याचं ठरवलं.  या बहीण-भावांनी आपल्या आईची संमती मिळवली आणि तिच्याकडून 320 डाॅलर घेतले. त्यानंतर त्यांनी गावातच दोन खोल्या भाडेतत्वावर घेतल्या. त्यानंतर हप्त्यावर दोन शिलाई मशीन आणि कर्जावर कच्चा माल खरेदी करत व्यवसाय सुरू केला. हे वाचा - चंदा कोचर यांना आणखी एक मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका आपल्या बहीण-भावानं व्यवसायातून सहभाग काढून घेतल्यानंतर टाॅमस जी. बाटा यांनी निराश न होता सहा वर्षांत आपला व्यवसाय अशा स्थितीत नेला की त्यांना आपलं दुकान देखील अपुरं पडू लागलं. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी टाॅमस यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावं लागलं. एकवेळ तर अशी आली की कर्ज फेडू न शकल्यानं त्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागला. यावेळी टाॅमस आणि त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांनी न्यू इंग्लडमधील एका शूज कंपनीत मजूर म्हणून काम केलं. यादरम्यान त्यांनी अनेक कंपन्यांच्या कामकाजाचा बारकाईनं अभ्यास केला. त्यांची कार्यप्रणाली समजून घेतली आणि ते मायदेशी परतले. त्यानंतर ते पुन्हा नव्या जोमानं कामाला लागलं. 1912 मध्ये त्यांनी 600 मजुरांना नोकरी दिली. शेकडोंना त्यांच्या घरातच काम उपलब्ध करुन दिले. उत्पादन तसंच विक्रीच्या नव्या योजना राबवल्या आणि बाटाची विशेष दुकानं स्थापन केली. महायुद्धानंतर बाटानं उत्पादनांच्या किमती कमी करण्याचं सूत्र अवलंबलं. त्यामुळे कंपनीची मोठी प्रगती आणि विस्तार झाला. बाटाच्या शूजचे उत्पादन 15 पट वाढले आणि सुमारे 27 देशांमध्ये त्याचा विस्तार झाला. भारतही त्यापैकी एक होता. बाटा स्टोअर्सची किरकोळ विक्रीची साखळी खूपच गाजली आणि शेकडो फ्रॅंचायझी सुरू झाल्या. हे वाचा - कोरोना व्हायरस लशीचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम, 5 महिन्यातील नीचांकी स्तरावर सोन्याचे दर दरम्यान पुढील 50 वर्षांचा विचार करून बाटानं मोजे, लेदरचं साहित्य, रसायनं, टायर, रबरच्या वस्तूंची निर्मिती करून कंपनीचा विस्तार केला. त्यामुळे बाटा ही एक कंपनी न राहता तो एक ग्रुप बनला होता. त्यानंतर लवकरच बाटा ही जगातील सर्वात मोठी शूज निर्यातदार कंपनी म्हणून नावारुपास आली. टॉमस बाटा यांनी आपल्या कंपनीचे मुख्यालय अशा इमारतीत बांधले की जी इमारत युरोपातील सर्वात मोठी काँक्रिटची इमारत समजली जाते. 12 जुलैला एका विमान अपघातात टॉमस यांचा दुर्देवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांच्याच कारखान्याच्या एका इमारतीच्या चिमणीला हे विमान धडकून अपघात झाला.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Money, Start business, World news

    पुढील बातम्या