त्वचेच्या प्रत्येक समस्या दूर करेल चंदन; फक्त समजून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

त्वचेच्या प्रत्येक समस्या दूर करेल चंदन; फक्त समजून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

अशा पद्धतीने तुम्ही चंदन (sandalwood) वापरलं तर तुम्हाला सौंदर्य खुलवण्यासाठी ना ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज, नाही कोणत्या महागड्या सौंदर्यप्रसाधनांची.

  • Last Updated: Oct 13, 2020 07:09 PM IST
  • Share this:

मुरुम, डाग, टॅनिंग आणि डार्क सर्कल यासारख्या त्वचेच्या समस्या (Skin problem) आजकाल बऱ्याच सामान्य आहेत. व्यस्त जीवन आणि सतत वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहेत. या समस्या दूर ठेवण्यासाठी 8 ते 9 तासांची झोप, भरपूर पाणी पिणं आणि आपल्या रोजच्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. याशिवाय त्वचेवर बाहेरूनही उपचार करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही चंदनाची (sandalwood) मदत घेऊ शकता.

आयुर्वेदात चंदनाचं खूप महत्त्व सांगितलं आहे. चंदन लाकडी, पावडर स्वरूपात उपलब्ध असतं. शिवाय चंदनाचं तेलही तुम्ही वापरू शकता. त्वचेच्या अनेक समस्या चंदनामुळे दूर होतात. चंदनाचा वापर तुम्ही कसा करू शकता पाहा.

सूर्यप्रकाशाचा त्वचेवर होणार परिणाम

myupchar.com च्या डॉ.अप्रतिम गोयल यांनी सांगितलं, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं रक्षण करणं फार महत्वाचं आहे. चंदन सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण करतं. सनबर्न झाल्यास चंदन एक थंड प्रभाव देते, ज्यामुळे सनबर्नमुळे होणारा लालसरपणा कमी होतो. यासाठी 1 चमचे चंदन पावडर 1 चमचे मधात मिसळून पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. 30 मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवा.

मुरुम आणि ब्लॅकहेड्स

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. उमर अफरोज यांनी सांगितलं, तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मुरुमाची समस्या अधिक असते. त्वचेतील तेलग्रंथी, संप्रेरकाच्या बदलांमुळे देखील मुरुमांचे त्रास उद्भवतात. चंदन ही समस्याही दूर करू शकतं.

हे वाचा - लालबुंद डाळिंबाची पानंही आहेत गुणकारी; जाणून घ्या 5 फायदे

1 चमचा चंदन तेलात एक चिमूटभर हळद आणि कापूर घाला आणि फेस पॅक म्हणून लावा. रात्रभर हा फेस पॅक लावून ठेवा यामुळे मुरुम, डाग आणि ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळेल. तुम्ही यासाठी 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा नारळ तेल आणि थोडा लिंबाचा रस याचाही वापर करू शकता. हा पॅक चेहऱ्यावर लाव्लायनंतर अर्धा तास ठेवा आणि नंतर नंतर कोमट पाण्याने धुवा.

डाग

1 चमचा चंदन पावडर आणि नारळ तेल एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा. तुम्ही चंदन आणि नारळतेलाऐवजी चंदन, हळद समप्रमाणात घेऊन त्यात एक कापूराची गोळी आणि एक चमचा दूध टाकून ही पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मसाज करून ठेवा आणि सकाळी चेहरा स्वच्छ करा.

मृत त्वचा

मृत त्वचा काढून टाकण्यासाठीदेखील चंदन वापरता येतं. यासाठी 1 चमचा काळ्या चण्याची पावडर 1 चमचा चंदन पावडरमध्ये मिसळा. त्यात दूध किंवा गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्यावर मालिश करा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - पुरळ उठणेः लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 13, 2020, 7:09 PM IST

ताज्या बातम्या