Sex power वाढवण्यासाठी विकला जातोय तब्बल 3 कोटींचा साप!

Sex power वाढवण्यासाठी विकला जातोय तब्बल 3 कोटींचा साप!

पुरुषांसाठी या सापाचे विष फायद्याचं असं मानतात. अर्थात याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाचे मूल्य तीन कोटींपेक्षा जास्त आहे.

  • Share this:

ंनवी दिल्ली, 07 डिसेंबर : दुर्मिळ प्रजातीच्या सापाची विक्री केल्या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. जय प्रकाश शर्मा असे या इसमाचे नाव असून त्यानं तब्बल 3 कोटींना एक साप विकला. पोलिसांनी जय प्रकाशकडून सर्वात दुर्मिळ असा 'सँड बोआ' साप जप्त केला आहे. हा साप लैंगिक शक्ती वृद्धीसोबतच कर्करोग आजाराच्या उपचारासाठी, महागडे परफ्युम आणि अंमली पदार्थ म्हणूनही वापरला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाचे मूल्य तीन कोटींपेक्षा जास्त आहे.

असे पडले सँड बोआ नाव

सॅंड बोआ हा साप वाळूखाली लपून राहतो. त्यामुळं याला सँड बोआ असे नाव पडल्याचे सांगितले जाते. मुख्म म्हणजे अॅनाकोंडा सापाप्रमाणे सँड बोआ याचेही डोळे डोक्यावर असतात. या सापाला पकडणे फार कठिण असते कारण हा सापा वाळूखाली असा काही लपतो की, त्याचे अवघे शरीर वाळूखाली जाते तर केवळ डोकेच वर असते. या सापाला वाळूखाली लपण्याचा फायदा हा शिकार करताना होतो. शिकार टप्प्यात येईपर्यंत तो अजिबात हालचाल करत नाही. काही लोक हा साप पळत असल्याचेही सांगतात.

वाचा-तुम्हाला स्पर्म काउंट वाढवायचाय? तर 'ही' गोष्ट दररोज खा, नक्कीच होणार फायदा

असा होतो सेक्स पावर वाढवण्यासाठी फायदा

या सापाला इरेक्टाइल डिस्फंक्शन (Erectile dysfunction) म्हणजेच पुरुषाच्या लिंगाला उत्तेजना न येण्याच्या समस्ये गुणकारी मानले जाते. त्यामुळं या सापाला आंतरराष्ट्रीय बाजारात खुप मागणी आहे. त्यातबरोबर सांधेदुकी इतर शारीरिक व्याधींवरही हा साप गुणकारी ठरतो म्हणे. त्याचबरोबर या सापाच्या त्वचेचा वापर सौदर्यप्रसादने आणि पर्स हँडबॅग तसेच जॅकेट बनविण्यासाठीही केला जातो.

वाचा-आपल्या पार्टनर सोबत करा हे काम, घरात नांदेल सुखच सुख!

कोठे आढळतात सँड बोआ साप?

सँड बोआ सापाच्या प्रजाती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळतात. या सापाची एक प्रजात उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आढळते. प्रामुख्याने प्रशांत महासागर किनारपट्टी, तर दुसरी प्रजाती युरोपी, उत्तर आफ्रीका आणि अशिया खंडातील काही देशांमध्ये सापडतात. या सापाची एक प्रजाती प्रामुख्याने भारत आणि अफ्रिकेतही आढळते.

वाचा-सोशल मीडियामुळे तरुणांच्या 'सेक्स लाईफ'वर होतोय वाईट परिणाम

सँड बोआ काय खातात?

सँड बोआ सर्व सापांप्रमाणे मांसाहारी असतात. ते जनावरांची शिकार करतात. त्यांची शिकार कोठे राहतात त्यानुसार त्यांची जागा बदलते. सँड बोआ साप हा उंदीर, सरडे, बेडूक, ससे इत्यादींची शिकार करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 10:15 PM IST

ताज्या बातम्या