Home /News /lifestyle /

Birthmark : जन्मजात शरीरावरील खुणांचे असते विशेष महत्व; म्हणून लकी ठरतात ही माणसं

Birthmark : जन्मजात शरीरावरील खुणांचे असते विशेष महत्व; म्हणून लकी ठरतात ही माणसं

या चिन्हांवरून कोणत्याही व्यक्तीचे स्वरूप आणि भविष्यातील घडामोडींची माहिती मिळू शकते. एखाद्या व्यक्तीला जन्मापासून असलेल्या प्रत्येक चिन्हाचे स्वतःचे महत्त्व आणि अर्थ असतो.

    मुंबई, 06 जुलै : काही लोकांच्या शरीरावर जन्मापासूनच काही खुणा दिसतात, ज्याला आपण जन्मखूणही म्हणतो. हे जन्मचिन्ह काहीही असू शकते. शरीरावर दिसणार्‍या काही खुणांच्याबाबतीत सामुद्रिक शास्त्रात तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की, या चिन्हांवरून कोणत्याही व्यक्तीचे स्वरूप आणि भविष्यातील घडामोडींची माहिती मिळू शकते. एखाद्या व्यक्तीला जन्मापासून असलेल्या प्रत्येक चिन्हाचे स्वतःचे महत्त्व आणि अर्थ असतो. याबाबत भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. जाणून घेऊया सामुद्रिक शास्त्रात शरीरावर काही खुणा असण्याचा अर्थ काय (Birthmark On Face) आहे. सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर जन्मापासूनच चिन्ह असेल तर अशा व्यक्तीची बुद्धी खूप तीक्ष्ण असते. या प्रकारचे लोक व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये खूप चांगले काम करू शकतात आणि हे लोक सर्वांना प्रिय देखील असतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी काहीतरी जन्मचिन्ह असेल तर अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते. या प्रकारचे लोक आनंदी असतात, ज्यामुळे त्यांचे प्रत्येक व्यक्तीशी नाते खूप घट्ट असते. सामुद्रिकशास्त्रात असे सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या गालावर जन्मचिन्ह असेल तर अशी व्यक्ती आपल्या नोकरी किंवा व्यवसायाबद्दल खूप उत्साही असते. या प्रकारची व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम सामुद्रिकशास्त्रानुसार, जर एखाद्या पुरुषाच्या गालावर उजव्या बाजूला जन्मचिन्ह असेल तर अशा व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय जर एखाद्या महिलेच्या उजव्या गालावर काही चिन्ह असेल तर अशा महिलेचा विवाह एखाद्या अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीशी होऊ शकतो. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार सामुद्रिकशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या मानेच्या मागील बाजूस जन्मचिन्ह असेल तर अशा व्यक्ती खूप आक्रमक असतात आणि अशा लोकांना खूप लवकर राग येतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य सामुद्रिकशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Personal life

    पुढील बातम्या