Home /News /lifestyle /

तुमच्या दररोजच्या आहारातील हा महत्त्वाचा एक पदार्थच ठरतोय तुमच्या केसगळतीचं कारण

तुमच्या दररोजच्या आहारातील हा महत्त्वाचा एक पदार्थच ठरतोय तुमच्या केसगळतीचं कारण

केसांच्या समस्यांसाठी आहारही कारणीभूत ठरतो. त्यामुळे केसगळतीची समस्या रोखण्यासाठी त्यातही बदल करणं गरजेचं आहे.

मुंबई, 04 मार्च : केस (hair) हा शरीराच्या सौंदर्याचा महत्त्वाचा घटक आहे. लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचं एक परिमाण मानलं जातं. प्रत्येकाला, खासकरून महिलांना चमकदार, मजबूत आणि घनदाट असे केस (Cause of Hairfall) जाम आवडतात. सर्व जण आपले केस सुंदर बनवण्यासाठी आणि चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी हेअर केअर प्रॉडक्ट्सचा वापर करतात. केसांच्या मजबुतीसाठी, तसंच ते चमकदार बनवण्यासाठी चांगल्या आहाराचीदेखील गरज असते. धूळ, प्रदूषण आणि दमट वातावरणामुळे केस खराब (Causes of hair loss) तर होतातच, सोबतच त्यांची चमकही जाते. केसांना योग्य पोषण न मिळाल्यास केस रुक्ष, कोरडे, निर्जीव होतात आणि गळतात. त्यामुळे केसांची सतत काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, का की मिठाचं सेवन जास्त केल्याने केस गळतात आणि पातळ होतात. 'आज तक'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. केस गळणं ही एक सर्वसामान्य समस्या आहे. अनेकांना केसगळतीचा त्रास होतो. स्त्रिया आणि पुरुष या दोघांमध्ये केसगळतीची कारणं (hair fall reasons) आणि प्रमाण वेगवेगळ्या प्रकारचं असतं. अँड्रोजेनेटिक अ‍ॅलोपेसिया हे केसगळतीचं सर्वांत समान कारण आहे. यात महिला आणि पुरुषांचे केस एकाच पॅटर्नमध्ये गळतात. सामान्यपणे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ही समस्या अधिक पाहायला मिळते. यात केवळ वय नाही, तर आहाराचादेखील केसांवर प्रभाव पडतो. आहारात मिठाचं सेवन जास्त प्रमाणात केलं गेलं, तर केसांवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात मिठाच्या सेवनाने आरोग्याला नुकसान पोहोचतं. मिठाचे जास्त सेवन केल्याने शरीरात सोडिअम तयार होतं आणि ते केसांच्या मुळात जमा होतं. याचा प्रभाव हेअर फॉलिकलच्या ब्लड सर्क्युलेशनवर होतो. परिणामी पोषक तत्त्वं केसांच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत. ही माहिती यूकेतले प्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट केविन मूर यांनी ब्रिटिश जीक्यूला दिलेल्या एका मुलाखतीत दिली. हे वाचा - बापरे! पाण्याचा थेंब जरी पडला तरी जळते तरुणीची त्वचा; घाम आणि अश्रूंपासूनही धोका शरीरात सोडिअमचं प्रमाण जास्त झाल्यामुळे केस निर्जीव आणि कमजोर होतात आणि केस गळती होते. तसंच शरीरात सोडिअम कमी असेल, तर केसांच्या विकासातही समस्या येते. कमी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडिनची कमतरता होते. ते गुड थायरॉइड फंक्शनसाठी गरजेचं आहे. थायरॉइड असंतुलित झालं, तर केसांवर त्याचा प्रभाव पडतो आणि केस निर्जीव, पातळ होतात, असं मूर यांनी सांगितलं. टोमॅटो सॉस, पॅक्ड फूड्स, ब्रेड्स, रेडी टू इट फूड्स, सॅंडविच आणि सूप अशा अनेक पदार्थांमध्ये आधीच मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे खरेदी करताना या गोष्टींवर लक्ष देण्याची गरज असते. खरेदी करताना पॅकेटवरची माहिती तपासावी. आपल्या शरीरातल्या स्नायूंचं काम चांगल्याप्रकारे होण्यासाठी शरीर मिठावर अवलंबून असतं. मिठाचं प्रमाण जास्त झाल्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं. यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. NHS मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात 6 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. हे जवळपास एका चमचा इतकं असते. त्यात 2.4 ग्रॅम सोडिअम असतं. जेवण बनवताना किंवा खाताना तुम्ही मिठाच्या प्रमाणाचा अंदाज घेऊ शकता. हे वाचा - महाशिवरात्रीला महादेवासाठी 'ठंडाई'चा नैवेद्य का? यात नेमकं काय असतं? केस मजबूत असणं हे आहारातली व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सवर अवलंबून असतं. आयर्न आणि व्हिटॅमिन B5 मुळे केस पातळ होण्यापासून वाचतात आणि डोक्याची त्वचादेखील चांगली राहते. तसंच केस मजबूत आणि चमकदार होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. त्यासोबतच वातावरणामुळेही केसांचा दर्जा खराब होतो. काही जणांमध्ये हे आनुवंशिकही असतं. आहाराची योग्य काळजी घेतली तर तुमचे केस मजबूत, मुलायम आणि सुंदर ठेवू शकता.
First published:

Tags: Beauty tips, Lifestyle, Woman hair

पुढील बातम्या