नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : मीठाशिवाय स्वयंपाकघर किंवा जेवणाची कल्पनाच करता येत नाही. पण याशिवाय मीठाचे (Salt) अनेक उपयोग आणि फायदे आहेत. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात देखील अनेक प्रकारचे दोष दूर करण्यासाठी मिठाच्या उपायांना खूप महत्त्व आहे. मीठाचे(Salt benefit) हे सोपे उपाय घर-ऑफिस आणि आयुष्यातील अनेक समस्या दूर करतात. पण हे उपाय करताना केलेली चूक महागातही पडू शकते. मीठाने वास्तू दोष कसे दूर केले जाऊ शकतात आणि या बाबतीत कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे ते जाणून घेऊया. याबाबत झी न्यूजने बातमी प्रकाशित केली आहे.
तणाव (stress) दूर करण्यासाठी : तणाव किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला फक्त आंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळून आंघोळ करावी लागेल. डोळे मिचकावताना तुम्हाला हलके वाटू लागेल.
निद्रानाश दूर करण्याचा उपाय (sleep problems) : झोप न येण्याच्या समस्येने तुम्ही हैराण असाल तर बेडरूममध्ये एका भांड्यात मीठ ठेवा. वास्तुदोष दूर होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल.
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी: एका भांड्यात एक चमचा मीठ टाकून त्यात एक कप पाणी घाला. असे भांडे घराच्या कोपऱ्यात ठेवा आणि काही दिवसांनी पाणी बदलत राहा. घरातील नकारात्मकता संपेल आणि सकारात्मक ऊर्जा येईल. पाणी बदलताना, ते सिंक किंवा बाथरूममधून फ्लश करा. इकडे तिकडे फेकू नका.
हे वाचा - सेक्स सीनला कथानकात नक्कीच महत्व; इंटिमेट सीनबद्दल विकी कौशलचा खुलासा
आजार दूर करण्यासाठी : घरातील लोकांना वारंवार आरोग्याच्या समस्या येत असतील तर एका भांड्यात थोडे मीठ टाकून बाथरूममध्ये ठेवा. तुम्हाला फरक स्पष्टपणे दिसून येईल.
हे वाचा - चिंता वाढली : दक्षिण आफ्रिकेहून पुण्यात आलेल्यांपैकी एक जण Covid पॉझिटिव्ह, 4 जण क्वारंटाईन
मिठाच्या उपायांमध्ये ही चूक करू नका
मिठाचे उपाय खूप प्रभावी आहेत पण त्यात केलेली चूक महागात पडू शकते. त्यामुळे हे उपाय चांगल्या ऐवजी वाईट परिणाम देऊ लागतील. कारण शुद्ध मीठाने योग्य प्रकारे केलेले उपाय सकारात्मकता आणतात परंतु, तसे न झाल्यास किंवा चुकीच्या पद्धतीनं नकारात्मकता वाढते. त्यामुळे या प्रकरणात सावधगिरी बाळगा. उदा. उपायासाठी मीठ वापरल्यावर ते बदलल्यावर जुने मीठ पाण्यात विरघळवून टाकावे. फेकून देऊ नका किंवा मीठ पुन्हा वापरू नका. हे उपाय करताना आठवड्यातून एकदा मीठ बदलणे पुरेसे आहे. वापरलेले मीठ तुमच्या अंगावर किंवा कुठेही पडले तर ते लगेच स्वच्छ करा.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामन्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.