मुंबई, 19 नोव्हेंबर : कोरोना (Coronavirus) आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan)च्या घरापर्यंत पोहोचला आहे. सलमानच्या घरातील स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळला. सलमानच्या ड्रायव्हरसह 2 जणं कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. त्यामुळे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबालाही कोरोनाव्हायरसची लागण तर झाली नाही ना अशी चिंता त्याच्या चाहत्यांना वाटू लागली. दरम्यान सलमान आणि त्याच्या कुटुंबाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट आला आहे.
स्टाफला कोरोना झाल्याचं निदान होताच सलमान आणि त्याचं कुटुंबं आयसोलेट झाल्याचं वृत्त पिंकव्हिलानं दिलं होतं. संक्रमित स्टाफ मेंबर्सना मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. मात्र खान कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलं नाही. दरम्यान आता आज तकच्या रिपोर्टनुसार सलमान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी मोठा दिलासा आहे.
हे वाचा - अक्षय कुमारचा यूट्यूबरवर 500 कोटींच्या मानहानीचा दावा; केले होते गंभीर आरोप
अभिनेता सलमान खान बिग बॉस-14 (Bigg Boss) हा शो होस्ट करत आहेत. अशात त्याच्या घरापर्यंत कोरोना पोहोचल्यानं सलमान आयसोलेट होणार होता त्यामुळे तो आगामी एपिसोडमध्ये दिसणार की नाही असा प्रश्न पडला होता. मात्र आता सलमान बिग बॉसचं शूटिंग करणार असल्याचंही सांगितलं जातं आहे. खबरदारी म्हणून बीएमसीनं सलमानचं घर सॅनिटाइझ केलं आहे.
हे वाचा - महिला IPS अधिकाऱ्याने KBC मध्ये जिंकले 1 कोटी रुपये
गेल्या एक-दोन महिन्यांपासून बॉलिवूड कलाकारांची कामं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. सर्वांनी 'New Normal' स्विकारत चित्रपट, मालिका, टेलिव्हिजन कार्यक्रमांचं शूटिंग सुरू केलं आहे. कोरोना लॉकडाऊन (Lockdown) काळात थांबलेली कामं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. मात्र असे असले तरीही कोरोनाची भीती अद्यापही कायम आहे. या कलाकारांचा दिवसभरात विविध लोकांशी संपर्क येत असल्याने ही भीती आहे.