Love Story : सलमान-ऐश्वर्याची प्रेमकहाणी जी राहिली अधुरी

Love Story : सलमान-ऐश्वर्याची प्रेमकहाणी जी राहिली अधुरी

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी कधीच विसरता येणार नाही अशी आहे. या लव्ह स्टोरीचे नायक होते सलमान खान. प्रेमाच्या आगीत तो इतका पेटून उठला की खलनायक बनला.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी कधीच विसरता येणार नाही अशी आहे. या लव्ह स्टोरीचे नायक होते सलमान खान. प्रेमाच्या आगीत तो इतका पेटून उठला की खलनायक बनला. ही गोष्ट आहे एका आशिकाची, त्यानं केलेल्या जीवापाड प्रेमाची. तो प्रेमात काहीही करायला तयार होता. पण आपल्या असंख्य चुकांनी प्रेमाचं सुंदर नातंच त्याच्यापासून दूर गेलं. एक प्रेमकहाणी, जी राहिली अधुरी.

असं सुरू झालं नातं

सलमान-ऐश्वर्याची प्रेमकहाणी 1997मध्ये सुरू झाली. सलमान त्यावेळी सुपरस्टार बनला होता. तर ऐश्वर्यानं मिस वर्ल्ड मिळवलं होतं. बाॅलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्याकाळात सलमानचं हृदय धडकत होतं ते सोमी अलीसाठी. त्यावेळी सलमान सोमीबद्दल सीरियस होता. तिच्याशी लग्नही करणार होता. पण त्याच वेळी सलमानची नजर ऐश्वर्यावर पडली. सलमान कधी अॅशच्या प्रेमात पडला हे त्याला कळलंच नाही.

सोमी अलीनं एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की सलमान आणि तिचं नातं तुटलं ते ऐश्वर्यामुळे. सोमी अली परदेशातच निघून गेली. सलमाननं मन्सुर अलीचा जोश सिनेमा नाकारला. कारण त्या सिनेमात त्याला ऐश्वर्याच्या भावाची व्यक्तिरेखा साकारायची होती.


सलमाननं केली ऐश्वर्याला मदत

असं म्हणतात, सलमाननं ऐश्वर्याचं करियर बनवण्याचा जणू विडाच उचलला होता. अनेक निर्मात्यांकडे तिच्यासाठी शब्द टाकला. सलमानमुळेच ऐश्वर्याला हम दिल दे चुके सनम सिनेमा मिळालाय. सलमानचे मित्र संजय लीला भन्साळीनं अॅशला ब्रेक दिला. सिनेमाच्या शूटिंग वेळी दोघं एकमेकांच्या जवळ आले. इतके की प्रेमात आकंठ बुडाले. असं म्हणतात, या सिनेमात दोघांची दिसणारी केमिस्ट्री ही त्यांच्या प्रेमामुळेच होती.

सलमानचे मित्र म्हणायचे भाभी

ऐश्वर्या हळूहळू सलमानच्या आयुष्यात आली. त्याच्या कुटुंबाच्याही जवळ आली. सलमानचे मित्र तिला भाभी म्हणून हाक मारू लागले. अनेक मासिकांत असं छापून आलं होतं की ऐश्वर्याच्या आई-वडिलांना हे प्रेम मंजूर नव्हतं. त्यांनी तिला सलमानपासून लांब रहा म्हणून सांगितलं.  तेव्हा ऐश्वर्या नाराज होऊन वेगळी राहायला लागली.


असं तुटलं दोघांचं नातं

दोघांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. सर्ल काही संपवून ते गेलं. एका रात्री सलमान ऐश्वर्याच्या घरी रात्री पोचला. तिचा दरवाजा ठोकायला लागला. 19व्या मजल्यावरून उडी मारण्याचीही धमकी दिली. असं म्हणतात, दरवाजा ठोकल्यामुळे त्याचा हातही जखमी झाला. शेवटी 6 वाजता दरवाजा उघडला. सलमानच्या या हंगाम्यामागे कारण होतं. त्याला ऐश्वर्याशी लग्न करायचं होतं. पण ऐश्वर्या यशाची शिडी चढत होती. तिला त्यावेळी लग्नबंधनात अडकायचं नव्हतं. या घटनेबद्दल एका मासिकाला इंटरव्ह्यू देताना सलमाननं तो अॅशच्या घरी गेल्याचं कबूल केलं होतं.

त्यानंतर ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमानविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. सलमानची अब्रूच गेली. हळूहळू सलमान-ऐश्वर्यामध्ये दुरावा वाढत गेला. त्याच काळात अमेरिकेत गेलेल्या सोमी अलीनं सलमानला फोन करून वडिलांच्या आॅपरेशनसाठी मदत मागितली. तेव्हा सलमान अॅशला न सांगता अमेरिकेला गेला. ती चिडली आणि तेव्हाच तिनं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कुछ ना कहोच्या सेटवर सलमाननं जाऊन प्रचंड तमाशा केला. त्या सिनेमात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन होते. असं म्हणतात, सलमाननं अभिषेकच्या कारचीही तोडफोड केली. त्यादरम्यान 2002मध्ये ऐश्वर्या एका अॅवाॅर्ड फंक्शनमध्ये गेली होती. तेव्हा तिचा हात फॅक्चर होता. काही वर्षांनी एका मासिकाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अॅशनं सलमाननं मारलं असल्याचं सांगितलं. ती हेही म्हणाली की सलमानचा फोन उचलला नाही तर तो भांडायचा. शेवटी एका सुंदर लव्ह स्टोरीचा अंत झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या