Home /News /lifestyle /

नाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona test

नाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona test

सध्या कोरोनाव्हायरसची (coronavirus) लक्षणं दिसणाऱ्या लोकांची RT-PCR टेस्ट करून त्यांच्या कोरोनाचं निदान केलं जातं. मात्र RT-LAMP टेस्ट लक्षणं न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांचं निदान करण्यासाठी फायदेशीर असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
    टोकियो, 29 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसची (coronavirus) साथ जगभर पसरली आहे. सध्या कोरोनाच्या निदानासाठी (corona test) आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR) केली जाते. यासाठी घसा आणि नाकातील स्वॅब सॅम्पल्स घेतली जातात. या सॅम्पल्सच्या आधारे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही हे तपासलं जातं. मात्र ही टेस्ट खूप खर्चिक आहे, त्याचा रिपोर्ट यायला वेळही लागतो आणि त्यासाठी तज्ज्ञांची गरज पडते. शिवाय कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतरच बहुतेक लोक ही टेस्ट करतात. मात्र याच टेस्ट इतकी प्रभावी आहे ती म्हणजे  RT-LAMP टेस्ट. ज्यामध्ये लाळेचे नमुने घेऊन कोरोनाचं निदान शक्य आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुणीही ही टेस्ट करू शकतं. जपानमधील होक्कायदो विद्यापीठातील संशोधकांनी RT-LAMP टेस्टची परिणामकता तपासून पाहिली. Clinical Infectious Diseases हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोरोनाची लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांसाठी ही टेस्ट उपयुक्त असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. संशोधकांनी 2000 व्यक्तींच्या नाकातील स्वॅब आणि तोंडातील लाळेचे नमुने घेतले. RT-PCR आणि RT-LAMP या दोन्ही टेस्ट केल्या. या अभ्यासाच्या निष्कर्षाबाबत विद्यापीठातील टाकानोरी तेशिमा म्हणाले, "2000 जणांच्या नाकातील स्वॅब आणि लाळेचे नमुने घेऊन आम्ही तपासले. बहुतेक जणांच्या दोन्ही चाचण्या सारख्याच आल्या आहेत. नाकातील स्वॅब नमुन्यातून इन्फेक्शनचं निदान 77 ते 93 टक्के तर लाळेच्या नमुन्यातून इनफेक्शनचं निदान 83 ते 97 टक्के झालं.  तसंच कोरोनाची लागण झालेली नाही हे ओळखण्याची दोन्ही चाचण्यांची टक्केवारी 99.9 टक्के होती" हे वाचा - प्रत्येकी पंधरावा मुंबईकर कोरोनाला गेला सामोरा; Sero Surveyची धक्कादायक आकडेवारी "लाळेच्या चाचणीचे अनेक फायदे आहेत. ही चाचणी अतिशय सोपी असून रुग्णांना देखील यामुळे त्रास सहन करावा लागत नाही. सामान्यपणे nasopharyngeal swab testing मध्ये रुग्णांना नाकातील आणि घशातील सॅम्पल्स द्यावे लागत आहेत. यावेळी अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय नमुने घेणारी व्यक्ती त्या रुग्णाच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्यांनाही कोरोनाचा धोका असतो. पण लाळेचा नमुना सर्वसामान्य व्यक्तीही स्वत: देऊ शकतं, त्यासाठी प्रशिक्षित दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही.  त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोकादेखील कमी होतो", असं तेशीमा यांनी सांगितलं. हे वाचा - लवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला खेळांच्या स्पर्धा, विमानतळं  आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचण्या करताना या चाचणीची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य चाचणीपेक्षा लाळेची चाचणी प्रभावी असल्याचं शास्त्रज्ञ म्हणालेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या