मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बारिक, लठ्ठ असं काही नसतं हो! बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी अभिनेत्रीनं केलं न्यूड फोटोशूट, सईही झाली प्रभावित

बारिक, लठ्ठ असं काही नसतं हो! बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी अभिनेत्रीनं केलं न्यूड फोटोशूट, सईही झाली प्रभावित

स्वत:च्या शरीराला आहे तसं स्वीकारत स्त्रियांनी आत्मसन्मान वाढवावा यासाठी आता खूप प्रयत्न होताना दिसतात. असाच एक सुरेख प्रयत्न या मराठी अभिनेत्रीनं केला आहे. सई ताम्हणकरही त्यावर प्रभावित झाली आहे.

स्वत:च्या शरीराला आहे तसं स्वीकारत स्त्रियांनी आत्मसन्मान वाढवावा यासाठी आता खूप प्रयत्न होताना दिसतात. असाच एक सुरेख प्रयत्न या मराठी अभिनेत्रीनं केला आहे. सई ताम्हणकरही त्यावर प्रभावित झाली आहे.

स्वत:च्या शरीराला आहे तसं स्वीकारत स्त्रियांनी आत्मसन्मान वाढवावा यासाठी आता खूप प्रयत्न होताना दिसतात. असाच एक सुरेख प्रयत्न या मराठी अभिनेत्रीनं केला आहे. सई ताम्हणकरही त्यावर प्रभावित झाली आहे.

मुंबई, 2 जानेवारी : बॉडी शेमिंगला नकार देत बॉडी पॉझिटिव्हीटीचा (body positivity) आवाज उंचावण्याबाबत जगभरात बोललं जातं. मात्र तरीही सौंदर्य आणि झिरो फिगरबाबतचे स्टिरिओटाईप्स सहज मोडून पडताना दिसत नाहीत. ते मोडून काढण्यासंबंधी अभिनेत्री वनिता खरात हिनं नुकत्याच केलेल्या फोटोशूटचं आता अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिनंही मनमोकळं कौतुक केलं आहे.

'कबीर सिंग'मध्ये पुष्पाचा रोल करत लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची हास्यजत्रा विजेती अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हिनं नुकतंच रावण फ्युचर प्रॉडक्शन्ससाठी एक फोटोशूट (photoshoot) केलं. दिग्दर्शक अभिजित पानसे, ऍडगुरू-अभिनेता भरत दाभोळकर आणि छायाचित्रकार तेजस नेरूरकर (Tejas Nerurkar) यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

यात वनिता हिनं न्यूड फोटोत केवळ एका निळ्या पतंगाचा आडोसा घेत पोज दिली आहे. आपलं शरीर जसं आहे तसं ते मनापासून स्वीकारत, कशाचाच न्यूनगंड न बाळगता त्याला पूर्ण आनंदानं साजरं करण्याचा संदेश वनिता यातून देते आहे. तिच्या स्वतःच्या देहाला आणि स्व अस्तितवाला सन्मान देण्याचं प्रतिबिंब या फोटोत सुरेख उतरलं आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं आपल्या इन्स्टा अकाउंटवर वनिताचा हा लक्षवेधी ठरलेला फोटो शेअर करत त्यासंबंधाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सई म्हणते, 'यंदाचं हे वर्ष तुम्ही स्वतःला पूर्णांशानं स्वीकारण्याचं वर्ष आहे. स्वतःला अगदी खरोखर आणि निर्भयपणे स्वीकारा!

वनिता खरात हिनं हा फोटो शेअर करताना तिची भूमिका सोबत मांडली आहे. 'मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझ्यातल्या पॅशनचा, आत्मविश्वासाचा आणि अर्थातच माझ्या शरीराचाही अभिमान आहे. कारण मी म्हणजे ही अशी आरपार 'मी स्वतः' आहे!!!' या भूमिकेचंही सईनं भरभरून कौतुक केलं आहे.

सोबतच तिनं वनिता खरात आणि अभिजित पानसे, भरत दाभोळकर  व तेजस नेरूरकर यांचं मनापासून अभिनंदन केलं आहे.

'चला, आपण सगळेच या बॉडी पॉझिटिव्हिटी चळवळीत सहभागी होऊ यात' असं आवाहनही सईनं पोस्टाच्या शेवटी केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Instagram, Photoshoot