कित्येक वर्षे घनदाट जंगलच होतं तिचं जग; एकटीच राहणाऱ्या 76 वर्षांच्या लेडी मोगलीला मिळणार घर

कित्येक वर्षे घनदाट जंगलच होतं तिचं जग; एकटीच राहणाऱ्या 76 वर्षांच्या लेडी मोगलीला मिळणार घर

जगातली सर्वांत एकटी महिला म्हणून ती ओळखली जाते.

  • Share this:

मॉस्को, 17 डिसेंबर : आपल्यापैकी प्रत्येकाला मोगली माहिती आहे. जंगल बुकमधील त्या मोगलीला विसरणं शक्यच नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे प्रत्यक्षातही अशीच एक मोगली खरंतर लेडी मोगलीही आहे.  जी गेल्या कित्येक वर्षांपासून माणूस म्हणून एकटीच जंगलात राहते. जगाशी तिचा काहीही संबंध नाही, संपर्क नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र सध्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसबाबतदेखील तिला काहीच माहिती नाही.

रशियातील (russia)  76 वर्षांची महिला. अगाफ्या (Agafya) असं या महिलेचं नाव असून, ती सायबेरियाच्या (Siberia) जंगलात राहते आहे. जगातली सर्वांत एकटी महिला म्हणून ती ओळखली जाते. कारण तिचं कुटुंब नाही किंवा तिला कोणी नातेवाईकही नाहीत.

एका माहितीनुसार  स्टॅलिनच्या (Stalin) राज्यकाळात धार्मिक शोषणापासून वाचण्यासाठी अगाफ्याच्या कुटुंबानं 1936 मध्ये पळ काढला आणि ते जंगलात राहायला आलं. त्याच दरम्यान जंगलातच अगाफ्याचा जन्म झाला होता. त्यामुळे तिथंच ती वाढली. या महिलेनं आपल्या आयुष्याचा बहुतांश कालावधी जंगलातच व्यतीत केला आहे. तिच्या आयुष्याच्या पहिल्या 35 वर्षांत तिच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणाशीही तिचा संपर्क आला नव्हता. 1961 मध्ये तिची आई तर 1988 मध्ये तिच्या वडिलांचं निधन झालं. 1978 मध्ये त्यांच्या कुटुंबाचा शोध बाहेरच्या जगातल्या व्यक्तींना लागला. नैर्ऋत्य सायबेरियातल्या पर्वतरांगेत अभ्यासासाठी गेलेल्या भूगर्भशास्त्रज्ञांना आकाशातून प्रवास करताना या कुटुंबाचा शोध लागला होता.

हे वाचा - या देशातील नागरिक खाण्यावर घालवतात सर्वाधिक वेळ; भारत कितव्या नंबरवर?

स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी ही महिला जंगलातच शेतीही (Farming) करते. आतापर्यंत अगाफ्या जंगलातच राहिली असली, तरी आता वाढत्या वयामुळे जंगलात राहणं तिच्यासाठी अधिकाधिक कठीण होत चाललं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार या महिलेबद्दल माहिती मिळाल्यावर रशियात अॅल्युमिनियम उद्योगात असलेले बडे उद्योगपती (Businessman) ओलेग डेरिपस्का यांनी तिच्यासाठी घर बांधायचं ठरवलं. तिला शहरात राहायला येण्याबद्दल विचारण्यात आलं असता, तिने त्यासाठी नकार दिला. म्हणूनच आता शहरांपासून दूर असलेल्या जंगलातच तिच्यासाठी घर उभारलं जात आहे.

जंगलातले काही अधिकारी आणि त्या भागातल्या गव्हर्नरची टीम त्यांच्याशी अधून-मधून संपर्कात असते. इमर्जन्सीसाठी त्यांच्याकडे सॅटेलाइट फोन देण्यात आला आहे. जगाशी फारसा संपर्क नसल्याने कोरोना विषाणूच्या जागतिक साथीबद्दलही त्यांना माहिती असण्याची फारशी शक्यता नाही. या वर्षी एप्रिलमध्ये जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला होता, त्या वेळी त्यांना कोरोनाबद्दल काहीही माहिती नव्हती आणि त्यांना विनाकारण ताण न येण्यासाठी ही बातमी तेव्हाही सांगितली गेली नाही.

हे वाचा - विमानातून पडला iphone तुटला नाही; फ्री फॉल VIDEO झाला रेकॉर्ड

आयुष्याचा एवढा मोठा काळ एकट्याने व्यतीत केल्यावर आता ती स्वतःच्या नव्या घरात जाण्याची तयारी करत आहे. कोणी आपल्याबरोबर राहण्यास इच्छुक असल्यास जरूर यावं, कारण आता आपल्याला एकटं राहायची इच्छा नाही, असं आवाहनही अगाफ्याने केलं आहे.

Published by: Priya Lad
First published: December 17, 2020, 6:48 AM IST

ताज्या बातम्या