मॉस्को, 09 नोव्हेंबर : नदी (River) म्हटली की तिचं पाणी पारदर्शक असतं, त्यावर शेवाळ असेल तर नदीचा रंग हिरवा दिसतो. मात्र कधी अगदी रक्तासारखी लालभडक नदी तुम्ही पाहिली आहे का? सोशल मीडियावर (social media) सध्या अशाच एका नदीचा व्हिडीओ व्हायरल (video viral) होतो आहे. या नदीचं पाणी अगदी रक्तासारखं लाल आहे. व्हिडीओ पाहताच क्षणी ही नदी आहे की रक्ताचा पाट असाच प्रश्न तुम्हालाही पडेल.
सोशल मीडियावर ही व्हायरल झालेल्या नदीचा व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसला आहे. तिथल्या स्थानिकांच्या मनातही नदीचा अचानक बदललेला रंग पाहून भीती निर्माण झाली आहे. माणसंच नाही तर प्राण्यांनीही याचा धसका घेतला आहे. प्राण्यांनीदेखील या नदीकडे पाठ फिरवली आहे. कोणताच प्राणी या नदीवर जात नाही.
Река Искитимка в Кемерове окрасилась в красный цвет. Причины выясняются.
आता ही नदी नेमकी आहे तरी कुठे? तर ही नदी रशियात आहे. रशियाच्या दक्षिण भागात केमोरेवा शहरात असलेली ही इस्कितिम्का नदी. आज तकनं डेली मेलच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या रिपोर्टनुसार नदीच्या पाण्याचा रंग प्रदूषणामुळे बदलला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
स्थानिक रिपोर्टनुसार केमेरोवा क्षेत्रातील लोकांनी सांगितलं की, लाल रंगाचं हे पाणी एका ब्लॉक ड्रेनमधून येतं आहे आणि या समस्येवर मार्ग काडण्यासाठी प्रशासन सातत्यानं प्रयत्न करत आहेत. नेमकं कोणत्या केमिकलमुळे नदीचा रंग रक्तासारखा लाल झाला हे माहिती नाही. शिवाय या पाण्यामुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हेदेखील माहिती नाही. नदीच्या या प्रदूषणाबाबत आपल्याला माहिती दिली नव्हती, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. नद्यांचा रंग बदल हा जागतिक तापमानवाढीशीही जोडला जातो आहे.
आजतकच्या रिपोर्टनुसार रशियातील ही पहिलीच नदी नाही जिचा रंग असा लाल झाला आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम रशियातील नारो फोमिंस्क आणि वोज्देन्या नदीचा रंगही असाच लाल झाला होता. त्या नद्यांमध्येही केमिकल मिसळलं गेलं होतं.