मुंबई, 16 डिसेंबर : coronavirus चीनमधून भारतात आला तेव्हा आपण सगळ्यांनीच 2020 ला जस्ट वेलकम केलं होतं. लवकरच करोनानं खाऊन टाकलेलं 2020 संपून सगळ्यांना लस (Covid-19 vaccine) मिळणार आहे. लस मिळेल 2021 मध्ये. आता 2021 ला वेलकम तर म्हणावंच लागेल. डोळ्यांना न दिसत सगळीकडं पसरलेल्या करोनाला हुलकावणी देत वेलकम म्हणता येईल. फक्त सुरक्षेचे काही सोप्पे पण महत्त्वाचे नियम पाळा आणि घरीच करा तुमचा थर्टीफर्स्ट (thirty first) जोरात!
1) यादी लहान असू द्या
कमीतकमी लोकांना बोलवाल तर धोका मर्यादित राहील. तुमच्या मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलावाच, पण गरज वाटली तर त्यांना तीनेक दिवस आधीच कोविड टेस्ट करून घ्यायला सांगा. त्यातही घरी कुटुंबियांसोबतच पार्टी करणं तर सर्वात मस्त!
2) घरात प्रत्येक खोलीत आणि महत्त्वाच्या जागी हॅन्ड सॅनिटायजर ठेवा. बाथरूममध्ये हाताला लागेल अशा जागी साबण आणि हॅन्डवॉश असू द्या. पार्टीआधी आणि पार्टीदरम्यानही किमान दोनदा बाथरूम सॅनिटाईज करा.
3) फुड सेफ्टी पाळा.
फुड सेफ्टी अतिशय महत्त्वाची आहे. जेवणखाण करताना एकाच ताटात खाणं किंवा बुफे पद्धत टाळा. स्नॅक्स, पेयं आणली असतील तर ती प्रत्येकासाठी आधीच वेगवेगळ्या डिशेशमध्ये-ग्लासात काढून ठेवा.
4)मास्क-ग्लव्ज आहेत ना?
एक्स्ट्रा मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ज (हातमोजे) विकत आणून सापडतील अशा जागी ठेवा. आलेल्यांनी स्वतःचे किंवा तुमच्याकडील मास्क, ग्लोव्ज वापरावेत यासाठी आग्रही रहा. खाण्या-पिण्याची व्यवस्थाही अशा ठिकाणी करा जिथं जमलेल्यांना आवश्यक सोशल डिस्टंसिंग पाळता येईल.
आनंद साजरा करायची संधी वाया न घालवण्याइतकेच कोरोनापासून स्वतःला वाचवणेही महत्वाचे आहे हे विसरू नका. अशा प्रकारचे नियम पाळत आणि खबरदारी घेत तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत कराल, तर तुमच्यासह सगळ्यांच्याच ते हिताचं असेल. लागा मग तयारीला!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Mask, New year, Social distancing