मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रेग्नन्सीत अंघोळ करताना तुमची छोटीशी चूक गर्भातील बाळासाठी ठरू शकते घातक

प्रेग्नन्सीत अंघोळ करताना तुमची छोटीशी चूक गर्भातील बाळासाठी ठरू शकते घातक

फोटो सौजन्य - canva

फोटो सौजन्य - canva

प्रेग्नन्सीत (Pregnancy) महिलांना अंघोळीकडेही विशेष लक्ष द्यावं लागतं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 जानेवारी : शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं वाटण्यासाठी सर्वांत चांगला उपाय म्हणजे आंघोळ (Bath). अंघोळ केल्यावर थकवा दूर होतो आणि एकदम ताजंतवानं वाटतं. काही जण शॉवरखाली (Shower) उभं राहून आंघोळ करतात, तर काही जणांना बाथटबमध्ये (Bath Tub) अंघोळीचा आनंद लुटणं आवडतं. अनेकांना या सुविधा उपलब्ध नसल्याने नळाने बादलीत पाणी भरून घेऊन अंघोळ करावी लागते. प्रेग्नन्सीत (Pregnancy)  महिलांना अंघोळीकडेही विशेष लक्ष द्यावं लागतं.

गर्भारपणात तुम्हाला जास्त वेळ बाथटबमध्ये बसून आराम करायचा असेल किंवा गरम पाण्याने अंघोळ करायची असेल, तर सावधानता बाळगायला हवी. गर्भारपणात आंघोळ करताना बाळाच्या दृष्टीने सुरक्षित काय असू शकेल, याबद्दल माहिती घेऊन तसा बदल करण्याची गरज आहे. 'हेल्थलाइन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अंघोळीनंतर शरीर रिलॅक्स होतं आणि थकलेल्या मांसपेशींना आराम मिळतो. त्यामुळे गर्भारपणातही रोज आंघोळ करून काहीही नुकसान होत नाही; मात्र पाणी गरम असता कामा नये.

गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे पोटातलं बाळ आणि आई या दोघांनाही अनेक प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्याचसोबत गर्भारपणात स्टीम बाथ, सॉना बाथ, हॉट टब बाथही घेऊ नये. तुमच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्भारपणात अंघोळीच्या वेळी काय काळजी घ्यायची याबद्दलची ही माहिती.

हे वाचा - प्रदूषित हवा उठतेय गर्भातल्या बाळांच्या मुळावर; गर्भपाताची धक्कादायक कारणं उघड

गर्भारपणात अंघोळ कशी करावी?

गर्भारपणात रोज आंघोळ करू शकता. परंतु या गोष्टीची काळजी घ्यावी, की पाणी जास्त गरम असू नये. पाणी जास्त गरम असलं, तर रक्तदाब (Blood Pressure) कमी होऊ शकतं. थकल्यासारखं वाटू शकतं, चक्करही येऊ शकते. गर्भारपणात जास्त गरम पाण्याने आंघोळ केली, तर बाळाला जन्मजात काही विकार होण्याचीही शक्यता असते. रक्तदाब कमी झाल्यास गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत गर्भपात होण्याचीही शक्यता असते. गर्भारपणाच्या तिमाहीनुसार अंघोळीच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे पाहू या.

गर्भारपणाची पहिली तिमाही : गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत बाळाचे अवयव विकसित होऊ लागलेले असतात. अशा नाजूक अवस्थेत शरीराचं तापमान वाढलं तर गुंतागुंत होऊ शकते किंवा जन्मजात विकारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या तिमाहीत कोमट पाण्यानेच आंघोळ करावी. तसंच जास्त वेळ पाण्यात राहू नये. रसायनविरहित (Chemical free), ऑरगॅनिक (Organic) उत्पादनांचा वापर अंघोळीसाठी करावा. पाण्याचं तापमान 102 अंशांपेक्षा जास्त असता कामा नये.

गर्भारपणाची दुसरी तिमाही : या तिमाहीत बाळाची बरीच वाढ झालेली असते आणि गर्भवती महिलेचं पोटही बाहेर दिसू लागलेलं असतं. अशा वेळी डॉक्टर दररोज आंघोळ न करण्याचा सल्ला देऊ शकतात. त्यांनी तसा सल्ला दिल्यास तो मानावा. जास्त काळ शॉवरखाली राहू नये. कारण त्यामुळे व्हजायनल इन्फेक्शन (Vaginal Infection) होऊ शकतं. तसंच, गर्भारपणादरम्यान तुमचे पाय दुखत असतील, तर गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी तुम्ही पाय गरम पाण्यात काही काळ बुडवून ठेवू शकता.

गर्भारपणाची तिसरी तिमाही : तिसऱ्या तिमाहीत शरीरात वेदना असतात, सुटसुटीतपणा नसतो. या कालावधीत अंघोळीमुळे बराच आराम पडतो. त्या कालावधीत महिलांचं वजन वाढतं आणि चालताना त्रास होतो. त्यामुळे बाथरूममध्ये जाण्यासाठी कोणाची तरी मदत नक्की घ्यावी.

हे वाचा - पिल्लांना वाचवण्यासाठी घारीशी भिडली कोंबडी, अक्षरश: पिसंच काढली; VIDEO VIRAL

महत्त्वाच्या टिप्स

- गर्भारपणात आंघोळ करताना फ्थालेट, बीपीए लायनर आणि हानिकारक रसायनं असलेल्या उत्पादनांचा वापर करू नये.

- 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बाथटबमध्ये राहू नये. त्यामुळे व्हजायनल इन्फेक्शन होऊ शकतं.

- अरोमा ऑइलचा (सुगंधी तेल) वापर करू नये. काही वेळ अशा तेलामुळे अॅलर्जी येऊ शकते. त्यामुळे लेबर पेन्स होऊ शकतात किंवा गर्भपाताचीही (Miscarriage) शक्यता असते.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही गर्भारपणात बाळाची सुरक्षितता पाहून, तुमच्या शरीराची स्वच्छता राखू शकाल.

First published:

Tags: Health, Pregnancy, Pregnant woman, Woman