• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • दिवाळीत खूप खाल्लं, म्हणून आता वेगात वजन कमी करायला जावू नका; ऋजुता दिवेकरांनी दिला मोलाचा सल्ला

दिवाळीत खूप खाल्लं, म्हणून आता वेगात वजन कमी करायला जावू नका; ऋजुता दिवेकरांनी दिला मोलाचा सल्ला

वेगळे प्रकार करण्याची गरज नसून दिवाळीपूर्वी (after Diwali diet plan) आपला जो डाएट प्लॅन होता, तोच चालू ठेवावा, असे सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट, डाएटिशियन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर : दिवाळी संपून आता काही दिवस उलटून गेले आहेत. दिवाळीतील गोड-धोड पदार्थांमुळं खाताना अनेकांनी हात सैल सोडलेला असतो. त्यामुळं आता वजन वाढू लागल्यानं, काही झालं तरी ते कमी करायचंच असा चंग बांधून जास्त काळ उपाशी राहणं, इंटरमिजेट फास्टिंग करून वजन वेगात कमी करण्याचा प्रयत्न असतो. मात्र, असे काही वेगळे प्रकार करण्याची गरज नसून दिवाळीपूर्वी (after Diwali diet plan) आपला जो डाएट प्लॅन होता, तोच चालू ठेवावा, असे सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट, डाएटिशियन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओद्वारे त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
  दिवाळी झाल्यानंतर आता अनेकजण त्यांचा डाएट प्लॅन पाळण्याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. या दरम्यान नेमंक काय करावं, वजन कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा याबाबत त्यांनी व्हिडिओतून माहिती दिली आहे. हे वाचा - तुम्हालाही नीट दिसत नाही का? डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी या घरगुती उपायांचा करा अवलंब दिवाळीतील वेगवेगळे पदार्थ खाऊन ऑलरेडी व्हेरिएशन झालेलं असतं आणि त्यानंतर लगेच आणखीन डाएटमध्ये मोठे बदल केल्यास गडबड होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा दिवाळीपूर्वी जो डाएट तोच फॉलो करण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: