मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Rose Water Benefits : पिंपल घालवून त्वचेवर ग्लो आणते गुलाबपाणी, या 4 सोप्या पद्धतींनी वापरा रोज वॉटर

Rose Water Benefits : पिंपल घालवून त्वचेवर ग्लो आणते गुलाबपाणी, या 4 सोप्या पद्धतींनी वापरा रोज वॉटर

जर तुम्ही मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही गुलाब पाण्याच्या मदतीने ते दूर करू शकता. वास्तविक गुलाबाच्या पाण्यात असे अनेक घटक असतात जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

जर तुम्ही मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही गुलाब पाण्याच्या मदतीने ते दूर करू शकता. वास्तविक गुलाबाच्या पाण्यात असे अनेक घटक असतात जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

जर तुम्ही मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही गुलाब पाण्याच्या मदतीने ते दूर करू शकता. वास्तविक गुलाबाच्या पाण्यात असे अनेक घटक असतात जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च : आपण सर्वजण टोनर म्हणून गुलाबपाणी वापरत आलो आहोत. पण आम्ही तुम्हाला सांगतो की पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर करण्यासाठीही आपण गुलाबपाणी वापरू शकतो. खरं तर, ते त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यासाठी, मेकअप काढण्यासाठी, पुरळ दूर करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करण्यासाठीदेखील वापरता येते. स्टाइलक्रेजच्या मते, गुलाबपाण्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे मुरुम बरे करण्यासाठी आवश्यक घटक असतात. चला तर मग जाणून घेऊया गुलाब पाण्याच्या मदतीने मुरुमांची समस्या कशी दूर करू शकता.

गुलाब पाण्याचा फेस स्प्रे

एका स्प्रे बॉटलमध्ये शुद्ध गुलाबपाणी ठेवा आणि क्लिन्जरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. आता चेहऱ्यावर गुलाबजल स्प्रे करा आणि 20 सेकंद थांबा. मग ते कापसाच्या बॉलने पुसून टाका. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. असे केल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल साफ होते आणि पीएच पातळी देखील संतुलित राहते. त्यामुळे मुरुमांचा त्रास होत नाही.

काय आहे कोलेस्टेरॉल हेअर ट्रीटमेंट? निरोगी आणि चमकदार केस मिळवण्यासाठी घरीच असे घ्या उपचार

व्हिटॅमिन सी आणि गुलाब पाणी

एका भांड्यात व्हिटॅमिन सी टॅब्लेटची पावडर बनवा आणि त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब घाला. आता स्वच्छ त्वचेवर लावा. 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. व्हिटॅमिन सी खराब झालेल्या त्वचेला बरे करते आणि कोलेजनचे उत्पादन वाढवते. त्यामुळे त्वचेवरील पुरळ लवकर बरे होतात.

लिंबू आणि गुलाब पाणी

एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस घ्या आणि त्याच प्रमाणात पाणी घाला. आता कॉटन बॉलच्या मदतीने मुरुमांवर लावा.10 मिनिटांनी चेहरा धुवा. असे आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्याने मुरुमांची समस्या दूर होईल.

ग्लिसरीन आणि गुलाब पाणी

एका भांड्यात ग्लिसरीनचे दोन थेंब टाका आणि त्यात एक चमचा गुलाबपाणी घाला. आता मुरुमांवर लावा आणि कोरडे होऊ द्या. तुम्ही ते दिवसातून 1 ते 2 वेळा लावू शकता.

Prevent Hair Fall : केसगळतीचे मुख्य कारण असते चुकीचे पदार्थ खाणे, आजच आहारातून काढा हे पदार्थ

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Beauty tips, Health, Health Tips, Lifestyle, Skin care