पचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ

पचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ

आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या सैंधव मिठाचा (rock salt) सामान्यपणे उपवासाच्या पदार्थांमध्ये वापर केला जातो.

  • Last Updated: Sep 22, 2020 10:46 PM IST
  • Share this:

चिमूटभर मीठ (salt) खाद्यपदार्थांची चव वाढवतं. मात्र सामान्य मिठापेक्षा सैंधव मीठ (rock salt) उत्तम आहे. पण फक्त उपवासाच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. सैंधव मिठाचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. सैंधव मीठामध्ये सामान्य मिठापेक्षा जास्त खनिजे असतात, जी बऱ्याच प्रमाणात आपल्याला आहारातून मिळत नाहीत. ही खनिजं अनेक शारीरिक कार्यांसाठी फायदेशीर असतात.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, सैंधव मीठ सामान्यपणे रंगहीन किंवा पांढरे असते. मात्र त्यातील अशुद्धतेमुळे ते हलके निळे, लाल, गडद निळे किंवा पिवळे असू शकतं. सैंधव मीठ सर्वोत्कृष्ट मानलं जातं. म्हणून आयुर्वेदात सैंधव मिठाचा वापर करण्यास सांगितलं आहे. हे मीठ पंजाबच्या सिंध प्रदेशात आढळतं म्हणून त्याला सिंधूज असंही म्हणतात.

चांगल्या पचनक्रियेसाठी

सैंधव मीठ पचन वाढवण्यास तसंच भूक कमी करण्यास मदत करतं. पोटदुखीपासून मुक्त करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. त्याच्या वापरामुळे पोटात आम्लयुक्त पदार्थांची निर्मिती कमी होते. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या टाळता येते. आयुर्वेदानुसार ताज्या पुदीन्याच्या पानांसह लस्सीत सैंधव मीठ मिसळून पिणं फायद्याचं आहे. हे पोटातील जंत नष्ट करण्यात देखील उपयुक्त आहे. सैंधव मीठ लिंबाच्या रसातून प्यायल्याने पोटातल्या जंतांपासून मुक्तता मिळते.

चांगल्या चयापचयास प्रोत्साहित करते

myupchar.com च्या मेधावी अग्रवाल यांनी सांगतिलं, चयापचय ही एक प्रक्रिया आहे जी अन्नाला ऊर्जेत बदलते. सैंधव मीठ शरीरातली चयापचय शक्ती वाढवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. सैंधव मीठ शरीरातील पाण्याचे शोषण सुधारण्यास देखील मदत करू शकतं. शरीरातील खनिज आणि पोषक द्रव्यांना सहज शोषून घेतं.

स्नायूंना मजबुती

स्नायूंसाठी पोटॅशियम आवश्यक आहे. सैंधव मिठात पोटॅशियमशिवाय इतर घटकही असतात ज्यामुळे शरीराला मजबुती मिळते.  स्नायूंच्या वेदना टाळण्यास मदत होते.

घशाच्या समस्यांपासून आराम

घशात वेदना किंवा सूज येणं, कोरडा खोकला किंवा टॉन्सिल्स असल्यास कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकून गुळण्या करा या समस्या दूर होतील.

हिरड्यांसाठी लाभदायक

दात आणि हिरड्यांसाठी सैंधव मीठ लाभदायक आहे. याने हिरड्यांना मालिश करणं फायदेशीर आहे. यासाठी 1 चमचा सैंधव मीठ, कडुलिंबाची पूड आणि त्रिफळा चूर्ण याचं मिश्रण तयार करा. पाण्यत चिमूटभर हे मिश्रण घालून त्याच्या गुळण्या करा.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मिठाची कमतरता

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 22, 2020, 10:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading