रितेश आणि जेनेलिया देशमुख करणार अवयवदान; VIDEO VIRAL

रितेश आणि जेनेलिया देशमुख करणार अवयवदान; VIDEO VIRAL

डॉक्टर दिनाचं (doctors day) औचित्य साधत रितेश (ritesh) आणि जेनेलिया (genelia) या दोघांनी हा महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै : आज डॉक्टर दिन (doctors day). या दिनानिमित्त अभिनेता रितेश देशमुख (ritesh deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख (genelia deshmukh) या दोघांनीही मोठा निर्णय घेतला आहे. रितेश आणि जेनेलिया दोघंही अवयवदान (organ donation) करणार आहेत. डॉक्टर दिनाचं औचित्य साधत त्यांनी हा महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे.

जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दोघांनीही आपल्या या निर्णयाबाबत सांगितलं आहे. दोघांनीही आपले अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

या पोस्टमध्ये जेनेलियाने म्हटलं आहे,  “रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. मात्र आज डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत आहोत"

"हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI चे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकते, असं दोघंही म्हणालेत. शिवाय "तुम्हीदेखील पुढाकार घ्या आणि आयुष्य वाचवण्यासाछी प्रतिज्ञा करा, तुमचे अवयवदान करण्याची शपथ घ्या", असं आवाहनही दोघांनी केलं आहे.

हे वाचा - Tiktok वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त; म्हणाला माझ्या दोन बायका ढसाढसा रडल्या

एखाद्या रुग्णाच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यानंतर त्याजागी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव प्रत्यारोपित करता येतात. यासाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान करणं गरजेचं आहे. किडनी, यकृत असे काही अवयव जिवंतपणी दान करता येतात. तर शरीरातील इतर अवयव एखादी व्यक्ती ब्रेनडेड होते तेव्हा दान करता येतात. अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नवं आयुष्य जगण्याची संधी मिळते, त्यामुळेच अवयवदान म्हणजे जीवनदानच आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: July 1, 2020, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading