डायबेटिक फूट अटॅक; वेळीच उपचार न झाल्यास गँगरीनचा धोका

डायबेटिक फूट अटॅक; वेळीच उपचार न झाल्यास गँगरीनचा धोका

मधुमेही रुग्णांच्या शरीरातील अनियंत्रित साखरेमुळे त्यांना अनेक आजार बळावतात. याशिवाय त्यांना सर्वात जास्त धोका असतो तो म्हणजे फूट अटॅक (diabetic foot attack)

  • Last Updated: Sep 16, 2020 09:13 PM IST
  • Share this:

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते तेव्हा ती व्यक्ती मधुमेहाला बळी पडते. myupchar.com शी संबंधित डॉ. अनुराग शाही यांच्या मते, साखरेची पातळी वाढणे खूपच धोकादायक आहे आणि साखर कमी असणे देखील धोक्याचे चिन्ह आहे. मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरातील अनियंत्रित साखरेमुळे त्यांना अनेक आजार बळावतात. याशिवाय त्यांना सर्वात जास्त धोका असतो तो म्हणजे फूट अटॅकचा म्हणजेच पायाला गंभीर इजा होण्याचा.

फूट अटॅक म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्यावर उपचार काय हे समजून घेऊयात.

फूट अटॅक म्हणजे काय?

मधुमेह असल्यास शरीरात रक्तातील साखर वाढते. जर मधुमेह 10 वर्षांपेक्षा जास्त जुना असेल तर शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी तयार होऊ लागते, ज्यामुळे नसा संकुचित होऊ लागतात. रक्ताची गुठळी तयार होऊ पायांच्या नसांमध्ये अडथळा आणत असतील तर त्यांच्या पायाला इजा किंवा फूट अटॅक होऊ शकतो. यामुळे पाय काळे होतात आणि गँगरीन होऊ शकते. मधुमेही रुग्णांमध्ये एक लहान जखम जरी आढळली तरी ती जखम बरी होण्याऐवजी अधिक वाढते, ज्यामुळे अनेकदा पाय कापावा लागतो. ही समस्या उद्भवल्यास व्यक्तीला तीव्र वेदना होऊ शकतात.

फूट अटॅकची लक्षणं

  • ही समस्या झाल्यामुळे चालताना त्रास होतो.
  • काही काळानंतर रुग्णाला उभं राहणं आणि चालणं अशक्य होतं.
  • जर पायाला जखम झाली आणि ती बरी होत नसेल तर त्यावर त्वरित उपचार केले पाहिजेत.

फूट अटॅकचा योग्य उपचार

  • एंडोव्हस्क्युलर ट्रिटमेंटचा वापर पायाला झालेल्या इजेवर उपचारांसाठी केला जातो. यात हृदयाच्या रक्तवाहिन्यांना जसं फुगवले, स्टेनटिंग केलं जातं तसंच पायांच्या नसांनाही केलं जातं. त्यासाठी लहान चीर दिली जाते आणि त्यातून पायांच्या रक्तवाहिन्यामध्ये कॅथेटर घातलं जातं, जेणेकरून ब्लॉक झालेल्या क्षेत्रापर्यंत पोहोचता येईल. कॅथेटरच्या मदतीने अँजिओप्लास्टी देखील करता येते.
  • आणखी एक उपचार म्हणजे फिरणार्‍या ब्लेडचा वापर जो रक्तवाहिन्यांच्या आत शेविंग ब्लेडप्रमाणे काम करतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील आतील बाजूस घट्ट बसलेला मळ काढता येतो.

आहाराची काळजी घ्या

याशिवाय रुग्णांनी खाण्यामध्ये विशेष खबरदारी घ्यावी. सर्वप्रथम आपण आपल्या साखर पातळीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याचवेळी जास्तीत जास्त प्रथिनं आणि फायबर असलेला आहार घेतला पाहिजे. नियमितपणे 40-50 मिनिटांसाठी एखाद्याने हृदयासाठी फायदेशीर असा व्यायाम करणं आवश्यक आहे. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या मते मधुमेहावर नियंत्रण आणण्यासाठी जीवनशैलीकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम या आजारापासून दूर ठेवू शकतो.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख – मधुमेह

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 16, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading