Home /News /lifestyle /

हिवाळ्यात कोरोना वाढण्याचा इशारा; मास्क घालूनच सर्व सण साजरे करण्याचा सरकारचा सल्ला

हिवाळ्यात कोरोना वाढण्याचा इशारा; मास्क घालूनच सर्व सण साजरे करण्याचा सरकारचा सल्ला

 पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

हिवाळ्यातील कोरोनाचा धोका (coronavirus in winter) लक्षात घेता पुढील काही महिन्यांत येणारे सर्व सण मास्क (mask) घालूनच साजरे करा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

  नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारतात सध्या 61 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे (coronavirus) रुग्ण आहेत. त्यात आता लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. हिवाळा (winter) तोंडावर आहे आणि एक ना दोन कित्येक सण (festival) आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात अधिक सावध राहण्याची गरज आहे. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार आहे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे आणि त्यामुळे सर्व सण मास्क घालूनच साजरे करा असा सल्लाही दिला आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत कोरोना संक्रमण अधिक पसरू शकतो, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. हिवाळा श्वसनसंबंधी आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरससाठी पोषक आहे, त्यामुळेच हिवाळ्यात कोरोना अधिक पसरू शकतो, असं नीती आयोगाचे सदस्य आणि भारताच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के पॉल यांनी सांगितलं. "कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही महिन्यात आपल्याला मास्कवाली पूजा, मास्कवाली छटपूजा, मास्कवाली दिवाळी, मास्कवाला दसरा, मास्कवाली ईद साजरी करावी लागेल", असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. "आता अनेक सण, उत्सव येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक एकत्र येण्याची एकमेकांना भेटण्याची संख्या आहे. त्यात हिवाळाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात", अशा सूचना आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी दिली आहेत. हे वाचा - नो मास्क, नो एन्ट्री! महापालिका आयुक्तांकडून कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश केंद्र सरकारने सकाळी दहा वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाव्हायरस संक्रमितांची संख्या आता 61 लाख 45 हजार 292 झाली आहे. कोरोना संक्रमितांमध्ये 60 लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. भारताआधी अमेरिकेनं हा आकडा पार केला होता. हे वाचा - प्रत्येकी पंधरावा मुंबईकर कोरोनाला गेला सामोरा; Sero Surveyची धक्कादायक आकडेवारी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. 24 तासांत देशात 70 हजार 589 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 85 हजार 194 रुग्ण निरोगी झाले. आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 47 हजार 576 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर 24 तासांत देशात 776 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 96 हजार 318 झाली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Corona virus in india, Coronavirus

  पुढील बातम्या