Home /News /lifestyle /

तुमच्या स्वयंपाकघरातच आहे प्रदूषणापासून होणारे आजार टाळण्याचं रहस्य !

तुमच्या स्वयंपाकघरातच आहे प्रदूषणापासून होणारे आजार टाळण्याचं रहस्य !

प्रदूषणामुळे होणारे आजार टाळायचे असतील तर व्हिटॅमिन्सचा (Vitamins) समावेश तुमच्या आहारात अससायलाच हवा

    मुंबई, 11 नोव्हेंबर: हिवाळा सुरू झाल्यावर प्रदूषण वाढतं. हवेतल्या आर्द्रतेमुळे धुळीचे बारीक कण आणि परागकण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात त्यामुळे फुफ्फुसांचे आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्ही रोजच्या आहारात व्हिटॅमिन्सचा (Vitamins) समावेश केलात तर तुमचा फुफ्फुसांच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. धाप लागणं, जळजळ आणि फुफ्फुसांशी संबंधित सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी खाली दिलेली तीन व्हिटॅमिन हिवाळ्यात खाणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन A व्हिटॅमिन A हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि शरीरातील पेशींच्या वाढीला मदत करतं. फुफ्फुसांच्या एमब्रायोनिक विकासाबरोबरच अनेक पेशीसमूह आणि पेशींच्या विकासासाठी व्हिटॅमिन A उपयुक्त असतं. हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं आणि इतर अवयवांच्या नियमित कार्यामध्येही व्हिटॅमिन A महत्त्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन A  फॅट सोल्यूबल असल्याने शरीरात दीर्घ काळ राहतं. डेअरीची उत्पादनं, मासे, डाळी, गाजर, ब्रोकोली, खरबूज, फळांची पेयं यातून  व्हिटॅमिन A मिळतं. व्हिटॅमिन C या व्हिटॅमिनमुळे फुफ्फुसांचं अनेक आजारांपासून रक्षण होतं तसंच या व्हिटॅमिनचे अनेक फायदे मानवी शरीराला होतात. व्हिटॅमिन C मुळे  प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेत कोलाजेन तयार होण्यासाठी मदत करतं. प्रदूषणामुळे फुफ्फुसात जमा होणाऱ्या धुळीच्या कणांशी आणि विषारी घटकांशी  व्हिटॅमिन C लढा देतं. Allergy, Asthma & Clinical Immunology या जर्नलमध्ये 2014 ला प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार व्हिटॅमिन C फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतं आणि व्यायामानंतर दम लागण्याचं प्रमाण निम्म्याने कमी करतं. यात अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. फळं, मिरच्या, पेरू, किवी, ब्रोकोली, बेरी यामध्ये व्हिटॅमिन C  मोठ्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन D chronic obstructive pulmonary disease (COPD) एकदम वाढण्याचं प्रमाण व्हिटॅमिन D मुळे कमी होतं. व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे घरघर लागणं, ब्राँकायटिस, दमा आणि इतर श्वसनाचे आजार होऊ शकतात. सूर्यप्रकाशातून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D मिळू शकतं. ट्युना, सॅलमॉन, सॅरडिन आणि ऑइस्ट्रर तसंच अंड्यातील योक्समध्येही व्हिटॅमिन D मोठ्या प्रमाणात असतं.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या