#RightToDisconnect ऑफिस संपल्यावरही तुम्हाला बॉसचे फोन घ्यावे लागतात का?

#RightToDisconnect ऑफिस संपल्यावरही तुम्हाला बॉसचे फोन घ्यावे लागतात का?

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना ऑफिसची शिफ्ट संपल्यावरही फोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ऑफिसच्या संपर्कात राहावं लागतं. यामुळे कामाचा ताण वाढतो. यावर उपाय म्हणून #RightToDisconnect ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना ऑफिसची शिफ्ट संपल्यावरही फोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ऑफिसच्या संपर्कात राहावं लागतं. शिफ्ट संपल्यावर घरी पोहोचायचं आणि घरात पाऊल पडत नाही तोच ऑफिसमधून एखादा मेल पाठवण्यासाठी फोन येतो किंवा एखादं डिझाइन बनवून पाठवायचं असतं. याला नाही म्हणणं शक्यच नसतं.

अशा कामाच्या पद्धतीमुळे घरच्यांना वेळ देता येत नाही, ऑफिस आणि घर यामध्ये काही फरकच राहात नाही. यामुळे अनेकांना कामाचा ताण जाणवतो.याच समस्येवर उपाय काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी #RightToDisconnect या नावाने एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला यश आलं तर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

#RightToDisconnect या मोहिमेमध्ये आतापर्यंत 1 लाख 27 हजार लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या आहेत. तणावविरहित जगणं हा आपला अधिकार आहे आणि म्हणूनच आम्ही ही मोहीम सुरू केली आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, सर्वच नगरसेवक घेणार हातात 'कमळ'

बहुतांश कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 8 किंवा 9 तासांची शिफ्ट असते पण शिफ्ट संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव असतो. वीकेंड्स किंवा सुटी असली तरी ऑफिसचे इ मेल आणि फोन कॉलला उत्तरं देणं भाग असतं. त्यामुळेच एकदा ऑफिसची शिफ्ट संपली की ऑफिसच्या संपर्कात न राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दलचं एक विधेयकही संसदेत मांडलं होतं. या विधेयकामुळे तुम्हाला ऑफिस संपल्यानंतर तुमच्या बॉसकडे दुर्लक्ष करण्याचा हक्क मिळू शकेल! वैयक्तिक आयुष्य आणि कामाचे तास यांचं संतुलन असेल तरच हा कामाचा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता.

===============================================================================================

SPECIAL REPORT : प्रणिती शिंदे का बदलणार मतदारसंघ, काय आहे कारण?

First published: July 29, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading