मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Period Pain कमी करण्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी सांगितली 5 सुपरफूड्स

Period Pain कमी करण्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी सांगितली 5 सुपरफूड्स

आपल्यापैकी अनेक स्त्रियांना पाळीच्या वेगवेगळ्या समस्या (Menstrual Pain) असतात. पाळीचं टेन्शन नको असेल तर हे वाचा! रोजच्या आहारातले 5 पदार्थ सगळ्या समस्या सोडवू शकतात, असं न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतात.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 07 ऑक्टोबर: मासिक पाळीच्या समस्या आजकाल सर्वच महिलांना असतात. आजकालचं धकाधकीचं जीवन, फास्टफूडचा अतिरेक, जेवण आणि झोपण्याच्या अनियमित वेळा, स्ट्रेस अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना पाळीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पाळी नियमित न येणं, कमी किंवा जास्त रक्तस्त्राव, पाळीदरम्यान प्रचंड त्रास होणं. अशा वेगवेगळ्या समस्यांना समोरं जावं लागतं. त्यात नेहमीची धावपळ असतेच.

आपल्या लाइफस्टाइल आणि आहाराच्या पद्धतीमध्ये थोडे बदल केले तरी बऱ्याचशा समस्या दूर होण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आपली लाइफस्टाइल कशी असावी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घरगुती आहार घेतल्यास बऱ्याचशा समस्या दूर होऊ शकतात असं ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे.

'या' पदार्थांचं समावेश आहारात कराच !

सकाळी उठल्याबरोबर पाण्यात भिजवलेल्या मनुका आणि केशर खावं. दुपारनंतर 4 ते 5 च्या दरम्यान एक केळं नियमितपणे खावं. रोज चमचाभर तूप खाण्यामुळे पाळीदरम्यान उद्भावणारा त्रास कमी होतो. वजन वाढते म्हणून अनेकदा तूप खाणं टाळलं जातं पण एक चमचा तुपाचा वापर आपल्यासाठी अतिशय पोषक ठरतो.

याशिवाय आहारात बटाटा, सुरण, रताळ्याचा वापर हवा. राजगिरा हा आणखी एक नियमत खाण्यात येईल असा पदार्थ आहे. हे पाच पदार्थ नियमितपणे खाल्ले तर पीरियड पेन Polycystic Ovarian Disorder (PCOD) किंवा पाळीच्या वेळचा त्रास निश्चित कमी होईल, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एका

संध्याकाळी एक केळं खाणं अशा उपायांनी पाळीदरम्यान येणारे क्रॅम्प्स कमी येणं कमी होतं तसंच पाळीमध्ये अनेक जणींना मूड स्विंग्जची समस्या जाणवते तीदेखील यामुळे कमी होते असं ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं.

भारतीय महिलांच्या आहारात लोह (Iron), फॉलिक अ‍ॅसिडची, हिमोग्लॉबिनची कमतरता असते. या घटकांच्या कमतरतेमुळे महिलांना पाळीदरम्यान त्रास होतो. सुरण, रताळी, बटाटा यासांरख्या भाज्या आपल्या आहारात असणं अतिशय गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करू नये, असं सांगितलं जातं पण योग्य प्रमाणात बटाटा खाल्ल्यास त्याचा उपयोग अनेक आजारांना दूर ठेवतो. आठवड्यातून 3-4 वेळा या भाज्या आहारात असायला हव्या.

" isDesktop="true" id="485431" >

राजगिरा खाल्ल्यास आपल्याला कॅल्शियमची कमतरता कधीच जाणवणार नाही त्यामुळे राजगिरा लाडू, राजगिऱ्याची चिक्की हे खायला हरकत नाही.

ऋतुनुसार बाजरी, मका, ज्वारी यांचाही आपल्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. आजकाल मल्टिग्रेन आटा खाण्याचं प्रमाण वाढलं आहे पण सगळी धान्य एकत्र करुन खाण्यापेक्षा वेगवेगळी खाणं जास्त फायद्याचं ठरतं.

First published:

Tags: Health, Periods