मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्वप्नात पाहिलेल्या नंबरचं लॉटरीचं तिकीट घेतलं आणि निवृत्त अधिकारी झाला करोडपती

स्वप्नात पाहिलेल्या नंबरचं लॉटरीचं तिकीट घेतलं आणि निवृत्त अधिकारी झाला करोडपती

या व्यक्तीला स्वप्नात (Dream) काही आकडे (Numbers) दिसले. त्यानं या आकड्यांनुसार लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) खरेदी केलं होतं.

या व्यक्तीला स्वप्नात (Dream) काही आकडे (Numbers) दिसले. त्यानं या आकड्यांनुसार लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) खरेदी केलं होतं.

या व्यक्तीला स्वप्नात (Dream) काही आकडे (Numbers) दिसले. त्यानं या आकड्यांनुसार लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) खरेदी केलं होतं.

मुंबई, 2 जुलै : आपल्याकडx भरपूर पैसे (Money) असावेत असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी लोकं परिश्रम घेत असतात. hC काही लोकांना कमी कष्टामध्ये झटपट आणि भरपूर पैसा मिळावा, असं वाटत असतं. हे लोक लॉटरी, रेस आदी गोष्टींमध्ये त्यांचं नशीब आजमवण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात. एखादी व्यक्ती लॉटरी (Lottery) लागल्यानं रातोरात लखपती किंवा कोट्याधीश झाल्याचं आपण ऐकतो, वाचतो; पण अशी व्यक्ती अगदी लाखात एखादी असते. अमेरिकेतील (America) एक व्यक्ती सध्या अशाच काहीशा किश्श्यामुळे चर्चेत आहे. या व्यक्तीला स्वप्नात (Dream) काही आकडे (Numbers) दिसले. त्यानं या आकड्यांनुसार लॉटरीचं तिकीट खरेदी केली. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीचा आकड्यांचा नेम अचूक बसला आणि त्याला 1.97 कोटी रुपयांची लॉटरी लागली. `दैनिक भास्कर`नं या विषयीचं वृत्त दिलं आहे. फुक्रे हा हिंदी चित्रपट तुम्ही पाहिला असेल. त्यात अभिनेता वरुण शर्मानं चूचा नावाची भूमिका साकारली होती. या चूचाला रात्री स्वप्नात आकडे दिसत असतात. तो मित्रांच्या मदतीनं या आकड्यांची जुळवणी करून लॉटरी जिंकत असतो. असाच काहीसा किस्सा अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथील कोलमन यांच्या बाबतीत घडला आहे. स्वप्नात दिसलेल्या आकड्यांवरून कोलमन यांनी लॉटरी खरेदी केली आणि ते रातोरात कोट्यधीश (Crorepati) बनले आहेत. अमेरिकेत सामान्य माणसाला लॉटरी लागून तो कोट्यधीश बनल्याची ही काही पहिली घटना नाही. मिशिगन (Michigan) येथील एका ट्रक ड्रायव्हरने नुकतीच 7.5 कोटींची लॉटरी जिंकली. ``रस्त्यावरच्या एका गॅस स्टेशनवर मी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. मी नेहमीच या ठिकाणी लॉटरी खरेदी करायचो. जेव्हा मला लॉटरी लागल्याचं समजलं तेव्हा मी 1.5 लाख रुपये जिंकले असतील असं मला वाटलं होतं; पण जेव्हा मी 7.5 कोटी रुपये जिंकल्याचं कळालं तेव्हा मला क्षणभर विश्वासच बसला नाही,' असं या ट्रक ड्रायव्हरनं सांगितलं होतं. शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न माध्यमांमधील वृत्तानुसार, व्हर्जिनिया येथील व्हर्जिनिया लॉटरी कंपनी दर बुधवारी आणि रविवारी ड्रॉ (Draw) काढते. यात तीन विजेत्यांना बक्षीस दिलं जातं. यातला पहिला पुरस्कार 10 लाख डॉलर, दुसरा 5 लाख डॉलर आणि तिसरा अडीत लाख डॉलरचा असतो. 'मी हे लॉटरीचं तिकीट 2 डॉलरला खरेदी केलं होतं. पण मला लॉटरी लागेल असं वाटलं नव्हतं. मला लॉटरी लागली असून मी 1.97 कोटी रुपये जिंकले आहेत, हे जेव्हा मला लॉटरी अधिकाऱ्यांनी सांगितलं, तेव्हा मला विश्वास वाटला नाही. मी एक निवृत्त अधिकारी आहे. टीव्ही पहात असताना मला लॉटरीविषयी माहिती मिळाली. त्यावेळी आपण नशीब आजमावून पाहायला काय हरकत आहे, असा विचार करून मी लॉटरी खरेदी करण्याचा निश्चय केला. अखेरीस मी लॉटरी जिंकलो,' असं कोलमन यांनी सांगितलं.
First published:

Tags: America, Lottery, Money

पुढील बातम्या