राशीभविष्य : मीन आणि सिंह राशीच्या लोकांनी ठेवायला हवंं रागावर नियंत्रण

राशीभविष्य : मीन आणि सिंह राशीच्या लोकांनी ठेवायला हवंं रागावर नियंत्रण

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 03 एप्रिलचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 03 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या समस्या आणि काय अडथळे आहेत याची पूर्वकल्पना असेल तर आपल्याला समस्येवर तोडगा काढणं अधिक सोपं होतं जाणून घ्या आपल्यासाठी कसा असेल आजचा दिवस.

मेष - चिंता आणि ताण यामुळे आजचा आपला दिवस खराब जाऊ शकतो. स्वत:ला प्रोत्साहन द्या. चुकीचा मार्ग किंवा निर्णय निवडणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूत करू नका.

मिथुन - अडचणींचा सामना करण्यासाठी योग्य सल्ला घ्या. तणाव पूर्ण दिवस असेल.

कर्क - आर्थिक संकाटातून मुक्त व्हाल. प्रेमाचा आनंद घेता येईल. कामकाजाच्या दबावामुळे आपल्या विवाहित जीवनासाठी बराच काळ त्रास होत आहे.

सिंह - आपल्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक वादविवाद होऊ शकतात. नवीन कामे पूर्ण करण्यात महिला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य असेल.

हे वाचा-लॉकडाउनमध्ये भांडी घासण्याचे असेही फायदे, वाचाल तर करणार नाही कंटाळा

कन्या - दीर्घ मुदतीची गुंतवणूक टाळा. घरात वादविवाद झाल्यास कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल.आपल्या रागावर नियंत्रण ठेवा असं काही करण टाळा की ज्यामुळे आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल.

तुळ - पोटाचे आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. उत्पन्न वाढीचे स्रोत शोधत असाल तर सुरक्षित आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा.

वृश्चिक - विश्रांती घ्या. जास्त खर्च आणि हुशार आर्थिक योजना टाळा. कुटुंबियांसोबत आनंदात वेळ घालवाल.

धनु - घर आणि ऑफिसमधील काही दबाव आपला राग वाढवू शकतो. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आज त्यांचा उघडपणे खर्च करण्यास टाळा. प्रेमाच्या दृष्टीकोनातून हा दिवस खूप खास असेल.

मकर - नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी पैसे कमवू शकतात. जास्त काळजी करू नका, सर्व काही काळाबरोबर बदलते.

कुंभ- जोडीदाराचे प्रेम मिळेल. प्रेमात आशेचा किरण मिळेल. अफवांपासून दूर राहा. ताण घालवण्याचा प्रयत्न करा.

मीन- छोट्या गोष्टीतून स्वत:साठी अडचणी निर्माण करू नका. प्रेम आणि प्रणय आपल्याला आनंद देणारे असतील. चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वत:ला आवर घाला.

हे वाचा-घरातून LIVE करत होती अँकर, पाठीमागून शर्ट न घालता आले बाबा... पाहा VIDEO

First published: April 3, 2020, 9:01 AM IST

ताज्या बातम्या