Home /News /lifestyle /

सावधान! बदलत्या तापमानाचा आणखी एक धोका; प्राण्यांमार्फत माणसांमध्ये पसरू शकतो आजार

सावधान! बदलत्या तापमानाचा आणखी एक धोका; प्राण्यांमार्फत माणसांमध्ये पसरू शकतो आजार

बहुतांश संसर्गजन्य आजार (infectious disease) हे प्राण्यांमधून पसरतात, त्यामुळे तापमानातील बदलाच्या (climate change) समस्येवर प्रभावी उपाययोजना करणं किती गरजेचं आहे, याकडे संशोधकांनी लक्ष वेधलं आहे.

    वॉशिंग्टन, 26 नोव्हेंबर : हवामान बदलांमुळे (climate change) प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आजार (infectious disease) वाढण्याची शक्यता असून हे आजार माणसांमध्ये पसरण्याची  शक्यता असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. थर्मल मिसमॅच हायपोथेसिस (thermal mismatch hypothesis) या प्रक्रियेला पाठबळ देणारा एक अभ्यास अहवाल सायन्स जर्नलमध्ये (journal Science) प्रसिद्ध करण्यात आला आहे. तापमानातील वाढीमुळे थंड हवामानातील पोलर बेअरसारख्या प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आजार होतो आणि तापमानातील मोठ्या प्रमाणातील चढ-उतारांमुळे मोठ्या जीवांपेक्षा लहान जीव संसर्गजन्य आजारांचं अधिक प्रमाणात वहन करतात. रोगांचा प्रसार, त्यांची तीव्रता आणि प्राण्यांमधील संसर्गजन्य आजारांचा प्रसार याचं स्वरूप भविष्यात बदलू शकतं. प्राण्यांमधून आलेल्या रोगकारक जीवांमुळे सार्स-कोव्ह -2 सारख्या जागतिक साथीचा उद्रेक झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे या अभ्यासाला अधिक महत्त्व आलं आहे, असं अमेरिकेतील नोत्रे दाम युनिव्हर्सिटीत काम करणारे अभ्यासाचे सहसंशोधक जेसन रोहर यांनी सांगितलं. बहुतांश संसर्गजन्य आजार हे प्राण्यांमधून पसरतात, त्यामुळे तापमानातील बदलाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याचं गांभीर्य जाणून घेण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, असंही रोहर यांनी म्हटले आहे. हे वाचा - ...तर 20 लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात Unicef चा इशारा या अभ्यासासाठी संशोधकांनी सात खंडांमधील वेगवेगळ्या प्राण्यांमधील परजीवी घटक यंत्रणेचे सात हजार नमुने गोळा केले. यामध्ये असं आढळलं की थंड तापमानात प्राण्यांमधील रोगकारक जीव जास्त सक्रिय असतात, तर उष्ण तापमानात ते फार कार्यरत नसतात. थंड हवेच्या ठिकाणी आढळणारे रोगकारक जीव उष्ण तापमानात वेगाने वाढतात तर थंड हवेत जगणारे प्राणी उष्ण तापमान सहन करू शकत नाहीत, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. हे वाचा - मासिक पाळीबाबत मोठा निर्णय; जगातील एकमेव देशानं रचला इतिहास उष्ण रक्त असलेल्या प्राण्यांच्या तुलनेत थंड रक्त असलेले प्राणी तापमान बदलाला अधिक प्रतिसाद देतात, असंही यात आढळलं आहे. जागतिक हवामान बदलाचा परिणाम प्राण्यांमधील रोगकारक संसर्गाचा धोका किती आणि कसा वाढवू शकतो यावरही यात भर देण्यात आला आहे. विषुववृत्तीय प्रदेश, शीत कटिबंधातील प्रदेश यापेक्षा उष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये प्राण्यांमधून पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत आहे असंही या अभ्यासात म्हटलं आहे. तापमान बदल त्याचा प्राण्यांवर होणारा परिणाम, त्यांच्यातील रोगकारक जीवांचा फैलाव आणि माणसांमध्ये होणारा आजारांचा प्रादुर्भाव यातील परस्पर संबंधावर या अभ्यासात भर देण्यात आला असून आगामी निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारांची धोका लक्षात घेण्यासाठी याची मोलाची मदत होणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Serious diseases

    पुढील बातम्या