Home /News /lifestyle /

औषधांना दाद न देणाऱ्या बॅक्टेरियांची चिंता सोडा; Drug resistance साठी नवं अँटिबायोटिक्स तयार

औषधांना दाद न देणाऱ्या बॅक्टेरियांची चिंता सोडा; Drug resistance साठी नवं अँटिबायोटिक्स तयार

ड्रग रेझिस्टन्स (Drug Resistance) ही वैद्यकीय शास्त्रातील मोठी समस्या आहे.

वॉशिंग्टन, 04  जानेवारी : अँटिबायोटिक्स (Antibiotics) अर्थात प्रतिजैविकं हा रोगकारक जिवाणूंशी लढण्याचा रूढ आणि प्रभावी मार्ग आहे. मात्र त्यांच्या सातत्यपूर्ण वापरामुळे काही जिवाणू अँटिबायोटिक्सना दाद देईनासे झाले (Drug Resistance) आहेत. ड्रग रेझिस्टन्स ही वैद्यकीय शास्त्रातील मोठी समस्या आहे. या पार्श्वभूमीवर अशा जिवाणूंना मारू शकतील अशा नव्या वर्गाच्या संयुगांचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. त्यापासून अँटिबायोटिक्सचा नवा वर्ग (New Class) तयार होईल, जो ड्रग रेझिस्टंट जिवाणूंना नियंत्रित करू शकेल. अमेरिकेतल्या फिलाडेल्फियामधल्या (Philadelphia) दी विस्टार इन्स्टिट्यूटमधले सहाय्यक प्राध्यापक फारोख डोतीवाला यांनी सांगितलं, की ज्यांवरील उपचार कठीण होऊन बसले आहेत, अशा संसर्गांवर उपचार करण्याकरिता नवी औषधं विकसित करण्यासाठी आम्ही आता दुहेरी धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे हे नवी अँटिबायोटिक्स त्या जिवाणूला तर मारतीलच; पण शरीरातल्या प्रतिकार यंत्रणेच्या प्रतिसादातही सुधारणा होऊ शकेल. या संशोधनाबद्दलचा लेख 'नेचर' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ड्युएल अॅक्टिंग इम्युनो अँटिबायोटिक्स (Dual Acting Immuno Antibiotics) अशी या नव्या पिढीतल्या अँटिबायोटिक्सची ओळख आहे. सध्या अस्तित्वात असलेली अँटिबायोटिक्स बॅक्टेरियाच्या (जिवाणू) महत्त्वाच्या क्रियांवर हल्ला करतात. त्यात न्यूक्लिक अॅसिड (Nucleic Acid), प्रथिन संश्लेषण, पेशीपटल आणि मेटाबोलिक पाथवे समावेश असतो. पण बॅक्टेरिया स्वतःमध्ये जनुकीय बदल (Mutation) घडवून आणून ती अँटिबायोटिक्स निष्प्रभ करतो किंवा त्यांना बाहेर काढून टाकतो. हे वाचा - अरे देवा! कोरोनाचा आणखी एक स्ट्रेन; शास्त्रज्ञानं केलं Alert बॅक्टेरियावर (Bacteria) हल्ला करणं आणि त्याच वेळी शरीराची प्रतिकार यंत्रणा (Immune Response) विकसित करणं अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न केल्यास बॅक्टेरियाला ड्रग रेझिस्टन्स (Drug Resistance) विकसित करणं अवघड जातं, असं आमच्या लक्षात आलं, असं डोतीवाला यांनी नमूद केलं. मेटाबोलिक पाथवे (Metabolic Pathway) बहुतांश बॅक्टेरियासाठी महत्त्वाचा असतो. बहुतांश घातक जिवाणूंमध्ये त्यांची पेशी जिवंत राहण्यासाठी हा पाथवे आवश्यक असतो. त्यामुळे अँटिबायोटिक विकसित करताना मेटाबोलिक पाथवे हेच लक्ष्य ठेवायचं शास्त्रज्ञांनी ठरवलं.  त्यामध्ये आयसोप्रेनॉइड बायोसिन्थेसिस (Biosynthesis) घडून येतं. त्यासाठी आवश्यक असलेल्या IspH या विकरावर शास्त्रज्ञांनी लक्ष्य केंद्रीत केलं. हे विकर जिवाणूंच्या विश्वात मोठ्या प्रमाणावर असल्याने याद्वारे अनेक जिवाणूंना लक्ष्य करणं शक्य होऊ शकेल. हे वाचा - जेवताना तुम्हीही करता का या चुका? होऊ शकतात गंभीर परिणाम यासाठी शास्त्रज्ञांनी कम्प्युटर मॉडेलिंगचा (Computer Modelling) वापर केला. या विकरासोबत (Enzyme) कोणती संयुगं (Compounds) जोडली जाऊ शकतील याचा अभ्यास त्याद्वारे केला गेला आणि IsPH या विकराचं कार्य थांबवण्याची सर्वाधिक क्षमता असलेल्या संयुगांची निवड त्यासाठी केली गेली. या संयुगांमुळे शरीराच्या रोगप्रतिकारयंत्रणेला उत्तेजना दिली गेली आणि जिवाणू मारण्याची क्रियाही प्रभावीपणे झाली, असं इन-व्हिट्रो ट्रायल्समध्ये (In-vitro Trials) स्पष्ट झालं. मानवी पेशींसाठी ही संयुगं बिनविषारी (Non-Toxic) असल्याचंही स्पष्ट झालं, असं अभ्यासात म्हटलं आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health

पुढील बातम्या