Research: ...म्हणून विवाहबाह्य संबंधांत पुरुषांपेक्षा महिला असतात जास्त आनंदी

विवाहबाह्य संबंध ठेवण्यात जगभरात महिलांचं प्रमाण फार कमी आहे. पण ज्या विवाहबाह्य संबंधात असतात त्या या नात्यात पुरुषांपेक्षा जास्त आनंदी असतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 11:17 AM IST

Research: ...म्हणून विवाहबाह्य संबंधांत पुरुषांपेक्षा महिला असतात जास्त आनंदी

काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाची चहुबाजूंनी चर्चा झाली. काहींना हा निर्णय योग्य वाटला तर काहींना आता काळ सोकावेल अशी भीतीही वाटली. पण एका संशोधनामध्ये हे सिद्ध झालं आहे की विवाहबाह्य संबंधात पुरुषांपेक्षा महिला या जास्त आनंदी असतात.

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने विवाबाह्य संबंध गुन्हा नसल्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाची चहुबाजूंनी चर्चा झाली. काहींना हा निर्णय योग्य वाटला तर काहींना आता काळ सोकावेल अशी भितीही वाटली. पण एका संशोधनामध्ये हे सिद्ध झालं आहे की विवाहबाह्य संबंधात पुरुषांपेक्षा महिला या जास्त आनंदी असतात.

मिसौरी स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका एलिसिया वाकर यांनी 1 हजार लोकांवर रिसर्च केला. या रिसर्चमध्ये महिलांप्रमाणे पुरुषही सहभागी होते.

या रिसर्चमध्ये स्पष्ट झालं की, विवाहबाह्य संबंध ठेवण्यात जगभरात महिलांचं प्रमाण फार कमी आहे. पण ज्या विवाहबाह्य संबंधात असतात त्या या नात्यात पुरुषांपेक्षा जास्त आनंदी असतात.

विवाहबाह्य संबंधांचा सहज अनुभव घेऊन पाहू अशा आविर्भावात त्या या नात्यात येत नाही. असा विचार पुरुष मंडळी अधिक प्रमाणात करतात. महिला मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात असणाऱ्या त्रासामुळे हे पाऊल उचलतात.

रिसर्चमध्ये बहुतांश महिलांनी विवाहबाह्य संबंधात असण्याचं कारण देताना म्हटले की, त्यांना त्यांचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचं असतं. त्यात कोणतीही बंधंन त्यांना नको असतात. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात त्या अशा पुरुषांची निवड करतात जे त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...