सावधान! या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे तुम्हाला होऊ शकतो टीबी

या संशोधनासाठी तब्बल 6 हजार लोकांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. ते सर्व लोक क्षयरोग असलेल्या लोकांच्या संपर्कात होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2019 05:20 PM IST

सावधान! या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे तुम्हाला होऊ शकतो टीबी

तुमच्या आहारात व्हिटॅमिन एची कमतरता आहे का... तुम्ही गाजर, टॉमेटो, पालेभाज्या कमी खाता का... असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार व्हिटॅमिन एची कमतरता असेल तर क्षयरोग अर्थात टीबी होण्याची शक्यता दहापटीने वाढते.

व्हिटॅमिन ए तुमची प्रतिकारक शक्ती वाढवतं. त्यामुळे क्षय रोगावर हे पदार्थच औषध होऊ शकतात का याचा संशोधक अभ्यास करत आहेत. हे संशोधन हावर्डच्या प्राध्यापक मॅग्नम मुरे यांच्या टीमनं केलं आहे. या संशोधनासाठी तब्बल 6 हजार लोकांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. ते सर्व लोक क्षयरोग असलेल्या लोकांच्या संपर्कात होते.

यातील 250 लोकांना क्षयाची आधीच लागण झाल्याचं कळलं. तर अनेकांना नंतर लागण झाली. त्या सगळ्यांवर एक वर्षभर लक्ष ठेवण्यात आलं. यातील ज्या लोकांच्या आहारामध्ये व्हिटॅमिन एची कमतरता होती त्यांना क्षयाची लागण लवकर  झाल्याचं दिसून आलं. त्यातही 18 ते 19 वयोगटातल्या तरुणांमध्ये जर ही कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता वीसपट वाढते हे लक्षात आलं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आता केस पांढरे करण्यासाठी केमिकलची गरज नाही, या नैसर्गिक पद्धतींचा करा वापर

Loading...

मुलगी वयात आल्यानंतर या राज्यात साजरा होतो उत्साह!

या घरगुती उपायांनी दाताच्या दुखण्यावर मिळवू शकता आराम

मुलींशी फेसबुकवर बोलण्यापूर्वी या नियमांचा नीट विचार करा,कधीच होणार नाही रिजेक्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...