Research- घरात कुत्रा पाळल्यास कधीच होणार नाही हा गंभीर आजार!

Research- घरात कुत्रा पाळल्यास कधीच होणार नाही हा गंभीर आजार!

यात बॉडी मास इंडेक्स, शारीरिक श्रम, स्मोकिंग स्टेटस, रक्तदाब, रक्तातील ग्लूकोज आणि कोलेस्ट्रॉल यांचा समावेश करण्यात आला होता.

  • Share this:

अमेरिकेतील मेयो क्लिनिकने केलेल्या एका संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, पाळीव प्राणी त्यातही कुत्रा पाळल्याने हृदयसंबंधीत आजार कमी होतात. हा शोध मेयो क्लिनिक प्रसेडिंग्ज- इनोवेशन, क्वालिटी अँड आउटकम्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा शोध 1979 मध्ये त्या लोकांवर करण्यात आला ज्यांना हृदयाशी संबंधित कोणतेही आजार नव्हते. त्यांचं आरोग्य आणि दिनक्रमाच्या आधारे त्यांना सात भागांमध्ये विभागण्यात आलं. यात बॉडी मास इंडेक्स, शारीरिक श्रम, स्मोकिंग स्टेटस, रक्तदाब, रक्तातील ग्लूकोज आणि कोलेस्ट्रॉल यांचा समावेश करण्यात आला होता.

यानंतर संशोधकांनी जे प्राणी पाळत नाही, ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत आणि ज्यांच्या घरी फक्त कुत्रा आहे अशा तीन भागांमध्ये लोकांची विभागणी केली. सेंट एनी यूनिवर्सिटी हॉस्पिटलमधील इण्टरनॅशनल क्लिनिकल रिसर्च सेंटरमधील संशोधक एण्ड्रिया माउगेरी यांच्या मते, ज्यांनी आपल्या घरी पाळीव प्राणी पाळला होता ते शारीरिकरित्या जास्त सक्रिय होते. त्यांचं डाएट उत्तम होतं आणि शरीरातील साखरही मर्यादेत होती.

या संशोधनात हे सिद्ध झालं की, जर तुम्ही तुमच्या घरी कोणता पाळीव प्राणी पाळत असाल तर तुम्हाला हृदयाशी निगडीत समस्या होण्याची शक्यता फार कमी  आहे. तर दुसऱ्या संशोधनात हे सिद्ध झालं की कुत्रा पाळल्याने तुम्ही मानसिक पातळीवर जास्त सुदृढ असतात. हे संशोधन सेंट एनी यूनिवर्सिटी हॉस्पिटलमधील इण्टरनॅशनल क्लिनिकल रिसर्च सेंटर आणि यूनिवर्सिटी ऑफ कॅटेनिया यांनी मिळून केलं आहे. या प्रोग्रामला नॅशनल प्रोग्राम ऑफ सस्टेनेबिलिटी अँड द युरोपियन रिजनल डेव्हलपमेन्ट फंडने सहाय्य केलं होतं.

आयुर्वेदानुसार या गोष्टी कधीही एकत्र खाऊ नयेत, शरीराचं होतं नुकसान

Vastu: लग्नाला होतोय उशीर तर हे 6 उपाय करून पाहा, एका महिन्यात मिळेल परिणाम

चुकूनही पार्टनरला विचारू नका हे 6 प्रश्न, नात्यात येऊ शकतो दुरावा

SPECIAL REPORT : काश्मीर मुद्यावरून संरक्षणमंत्र्यांनी पाकला चांगलंच ठणकावलं, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 02:56 PM IST

ताज्या बातम्या