कोरोना लशींवर जगभरात संशोधन; कितपत मिळालं यश?

कोरोना लशींवर जगभरात संशोधन; कितपत मिळालं यश?

जगातील सुमारे 80 वैद्यकीय संस्था 120 कोरोना लशींवर काम करत आहेत.

  • Last Updated: Jul 13, 2020 09:15 PM IST
  • Share this:

कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी जगभरातील देश लस शोधण्याच्या कार्याला लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगातील 102 संस्था या लस शोधण्याच्या कामाला लागल्या आहेत. सुमारे 80 वैद्यकीय संस्था 120 लशींवर काम करत आहेत. अनेक देशात तर लसींचे परीक्षणही सुरू झाले आहे.

myUpchar.com चे डॉ. अजय मोहन यांनी सांगितल्यानुसार, जोपर्यंत कोरोना विषाणूवर उपचार मिळत नाही तोपर्यंत फक्त त्याच्या लक्षणांवर उपचार केले जातील. चला तर जाणून घेऊया कुठल्या प्रमुख देशांमध्ये कोरोनाच्या लशींवर काम सुरू आहे आणि त्यांना किती यश मिळाले आहे.

चीनमध्ये लशींचे परीक्षण

चीनच्या वुहान शहरात सर्वात प्रथम कोरोनाने थैमान घातले. येथूनच कोरोनाचा संसर्ग सर्व जगात पसरला. आता चीनसुद्धा या आजारावर औषध शोधण्याच्या कामाला लागला आहे. येथील प्रसिद्ध कंपनी सिनोवेक बायोटेक यावर काम करते आहे. याशिवाय कॅनसिनो बायोलॉजी आणि वुहान इन्सिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स या कंपन्यादेखील लस बनवत आहेत. त्यांची लस परीक्षणाच्या पहिल्या टप्यात आहे. सिनोवेक बायोटेक मानवी परीक्षण करत आहे.

अमेरिकेमध्ये लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत

अमेरिकेची फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्ना पण लशीवर काम करते आहे. त्यांची परीक्षणे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. या कंपनीचा दावा आहे की 2020 संपेपर्यंत लस तयार होऊन जाईल. अमेरिकेच्या 2 अन्य कंपन्या, फाइजर आणि जॉन्सन अँड जॉन्सनसुद्धा लस शोधत आहेत. एक अन्य कंपनी गिलियाड सायन्सने रेमडेसिवीर नावाचे औषध बनवले आहे, जे हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधापेक्षा जास्त परिणामकारक मानले जात आहे. प्राथमिक संशोधनानुसार कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर रेमडेसिवीरचा चांगला परिणाम दिसून येतो आहे.

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधन

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनेसुद्धा दावा केला आहे की त्यांच्या लशीला 80 टक्के यश मिळू शकते. मागील महिन्यात त्यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या केल्या, त्याचे परिणाम चांगले दिसून आले.

इटलीत उंदरावर प्रयोग

इटलीच्या टॅकिज बायोटेक कंपनीने लस शोधल्याचा दावा केला आहे, त्यांचे संशोधन खूपच पुढे गेले आहे, असे ते म्हणतात. टॅकिजचे सीईओ ओरिसिचिओ यांनी सांगितले आहे कि संशोधन सुरू आहे. त्यांचा दावा आहे की, ही लस मानवी पेशीवर काम करेल . सध्या या लसीचा प्रयोग उंदरांवर केला जातो आहे. ज्यात उंदरांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होते आहे.

नेदरलँडमध्ये लसीचा शोध

नेदरलँडमधील संशोधकानी असे प्रतिजैवक शोधून काढली आहेत जे कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनला जखडून टाकेल. त्यांनी हे स्पाइक प्रोटीन उंदरांमध्ये सोडले, त्यानंतर त्यांच्यात निर्माण झालेली 51 प्रतिजैवके वेगळी केली त्यातील एक प्रतिजैवक संसर्ग रोखण्यात यशस्वी झाले.

इज्राइल बनवत आहे प्रतिकारशक्ती मजबूत करणारे औषध

इज्राइल इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने एक प्रतिजैवक तयार केलं आहे. जे मोनॉक्लोनप्रमाणे कोरोना विषाणूवर हल्ला करेल. पण या लशीचे परीक्षण प्राण्यांवर सुरू आहे की मानवांवर याची माहिती अजून मिळालेली नाही.

भारतही पिछाडीवर नाही

भारतातील इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनेशनलने एकत्र येऊन लस शोधण्याचे काम सुरू केले आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी पुण्यात वेगळ्या केलेल्या विषाणूच्या स्ट्रेनचा उपयोग केला जातो आहे. आईसीएमआरच्या माहितीनुसार नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये वेगळ्या करण्यात आलेल्या विषाणूचा स्ट्रेन यशस्वीपणे भारत बायोटेक इंटरनेशनलमध्ये पाठवण्यात आला आहे आणि लस निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे.

अतिरिक्त माहिती साठी वाचा आमचा लेख - संसर्गजन्य रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 13, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading